Fertilizer Supply : चांदूरबाजार येथील रॅक पॉइंटचे भविष्य अधांतरी

Chandur Bazar : चांदूर बाजार येथे खतांच्या पुरवठ्यासाठी रॅक पॉइंट उभारणे आर्थिकदृष्टीने परवडणारे नसल्याने गुंतवणुकीसाठी बिडर समोर येईनासे झाले आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

Amravati News : चांदूर बाजार येथे खतांच्या पुरवठ्यासाठी रॅक पॉइंट उभारणे आर्थिकदृष्टीने परवडणारे नसल्याने गुंतवणुकीसाठी बिडर समोर येईनासे झाले आहे. रेल्वेने यापूर्वी केलेला प्रयत्न अपयशी ठरला असून, प्रस्तावित रॅक पॉइंट निर्मितीचा प्रश्‍न जटिल झाला आहे.

जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांच्या रेट्यामुळे भुसावळ मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पुन्हा पाहणी केली व प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले असले तरी रेल्वेला नफा दिसत नसल्याने तो वाणिज्यदृष्ट्या परवडेनासा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यातील सात तालुक्यांतील शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठा करण्यासाठी चांदूरबाजार येथे रॅक पॉइंट उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. सुमारे ११ कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी असली तरी येथे कोणताच बिडर समोर येत नसल्याचे वास्तव आहे.

खतांच्या पुरवठ्यासाठी बडनेरा, धामणगावरेल्वे येथे रॅक पॉइंट आहेत. धामणगाव येथील पॉइंटवरून बहुतांश पुरवठा यवतमाळ जिल्ह्यास होतो. बडनेरा येथूनच जिल्ह्यातील सर्व भागात पुरवठा केल्या जातो.

Fertilizer
APMC Election Result : बच्चू कडूंचे चांदूर बाजार बाजार समितीवर वर्चस्‍व, सभापतीपदी राजेंद्र याऊल

वरूड, मोर्शी, अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगावसुर्जी, चिखलदरा व धारणी या तालुक्यांना पुरवठ्यासाठी भुसावळ -नरखेड रेल्वे मार्गावरील चांदूरबाजार येथे रॅक पॉइंट उपलब्ध करून देणे प्रस्तावित होते. गतवर्षी जुलैमध्येच त्यासाठी मंजुरी मिळाली आहे. रेल्वे विभागाने त्यासाठी स्वारस्य निविदा प्रक्रियाही केली, मात्र त्यास प्रतिसाद मिळालेला नाही.

कृषी विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर भुसावळ मंडळाचे सहायक वाणिज्य प्रबंधक (माल) अनिल बागळे, मार्केटिंग अ‍ॅण्ड सेल्स इन्स्पेक्टर उत्तम गोमटे, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक डी. बी. मीना या अधिकाऱ्यांनी कृषी सहसंचालक किसन मुळे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्यासह नुकतीच या जागेची पाहणी केली.

का होत नाही?

चांदूरबाजार येथे रेल्वेने वाहतूक करता येऊ शकेल, अशा वस्तूंच्या निर्मितीचे उद्योग नाही. या भागातील संत्री रेल्वेने अन्यत्र जात नाहीत. केवळ खतांची वाहतूक करावी लागणार आहे.

रेल्वे बिडरला ३५ वर्षांसाठी कंत्राटावर देत असून, त्याचा पैसा सद्यःस्थिती बघता या कालावधीत वसूल होणे अशक्य आहे. वाणिज्य दृष्टीने ते परवडेनासे असल्याने गुंतवणुकीस कोणीच समोर येत नसल्याने प्रस्तावित रॅक पॉइंट रखडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com