Watershed Management  Agrowon
ॲग्रो विशेष

Watershed Management : पाणलोट क्षेत्रातील जमिनीची होणारी धूप, भूजलाची उपलब्धता

Groundwater Conservation : तडसर ता. कडेगाव जि. सांगली या गावात एकूण भौगोलिक २५१४ हेक्टर क्षेत्र पैकी सर्वाधिक ८६० हेक्टर म्हणजेच एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३४ टक्के क्षेत्रावर मध्यम स्वरूपात जमिनीची धूप होत आहे.

Team Agrowon

Water Resource Protection : तडसर ता. कडेगाव जि. सांगली या गावात एकूण भौगोलिक २५१४ हेक्टर क्षेत्र पैकी सर्वाधिक ८६० हेक्टर म्हणजेच एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३४ टक्के क्षेत्रावर मध्यम स्वरूपात जमिनीची धूप होत आहे. या क्षेत्राचा संकेतांक e२ असा दर्शविला जातो. या खालोखाल ८२० हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच (एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के) जमिनीवर जास्त स्वरूपात मातीची धूप होत आहे. याचा संकेतांक e४ असा दर्शविला जातो.

तडसरमधील ४९० हेक्टर क्षेत्र (एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १९ टक्के) हे अति जास्त मातीच्या धुपीने प्रभावित आहे. या क्षेत्राचा संकेतांक e५ असा दर्शविला जातो. तडसर मधील केवळ ३०६ हेक्टर क्षेत्रावर (एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १२ टक्के) कमी स्वरूपाची जमिनीची धूप होते. या क्षेत्रात e१ संकेतांक दिला जातो. एकूणच तडसरच्या भौगोलिक क्षेत्रात मातीची धूप अधिक होते. कमी अधिक प्रमाणामध्ये संपूर्ण भौगोलिक क्षेत्रामध्ये मातीचे वहन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते.

प्रतिवर्षी विशेषतः जून महिन्याच्या सुरुवातीपासून पर्जन्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत ओढ्यांमधून गाळाचे वहन होते. यातील बराचसा गाळ हा सिमेंट बंधारा, मातीनाला बांध, कोल्हापुरी बंधारे यामध्ये साठून राहतो. यापूर्वी तडसर गावामध्ये झालेल्या पाणलोट क्षेत्र उपचारांपैकी ओढ्यांवरील सिमेंट बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साठला आहे. गाळामुळे ओढ्यांमध्ये पानवनस्पतींची वाढ होते व कालांतराने हे उपचार गाळाचा उपसा न केल्यास कालबाह्य ठरतात.

तडसर गावामध्ये २००२ ते २००५ या दुष्काळी परिस्थितीमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा म्हैसकर यांनी पाणलोट क्षेत्र उपचारांमध्ये गावाची निवड केली. त्याचा फायदा गावाला मोठ्या स्वरूपामध्ये झाला. मात्र क्षेत्र उपचार उदा. गावाच्या पश्चिम उत्तर डोंगर परिसरामध्ये वनीकरण, सलग समतल चर, अनघड दगडाचे बांध इ उपचार कमी प्रमाणामध्ये झाल्यामुळे मातीच्या धुपीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये मर्यादा आल्या. संपूर्ण राज्यामध्ये मातीची  धूप कमी अधिक प्रमाणामध्ये तडसर या गावासारखीच आहे.

तडसरमधील भूजलाची उपलब्धता

तडसर या गावामध्ये २५१४ या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी १०८६ हेक्टर ( म्हणजेच एकूण क्षेत्राच्या ४३ टक्के जमिनी) क्षेत्रामध्ये भूजलाची परिस्थिती गंभीर आहे. या क्षेत्रामध्ये गावाच्या दक्षिणोत्तर डोंगररांगाचा व त्यालगत शेती क्षेत्राचा समावेश होतो. त्यानंतर जवळपास ५८९ हेक्टर क्षेत्रावर (एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २३ टक्के) अत्यल्प प्रमाणात भूजल उपलब्ध होते. गावामध्ये ३४० हेक्टर क्षेत्रावर (एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १४ टक्के) मध्यम स्वरूपात भूजल उपलब्ध आहे.

सर्वसाधारणपणे हे क्षेत्र गावठाणाच्या आजूबाजूला पसरलेले आहे. गावामध्ये केवळ ४६६ हेक्टर (म्हणजेच एकूण क्षेत्रफळाच्या १९ टक्के) हे भूजल उपलब्धतेमध्ये चांगल्या प्रकारचे आहे. महाराष्ट्रामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार भूस्तर हा ८२ टक्के काळापासूनचा बनला आहे. त्यामुळे निसर्गनिमाने राज्यातील खडकांची पाणी मुरवून घेण्याची क्षमता अत्यल्प आहे.

तीच भूस्तर रचना तडसर गावाची आहे. त्यामुळे पर्जन्यधारीत पाण्याचा फार कमी लाभ गावाला मिळतो. त्यामुळे या ठिकाणी उपलब्ध भूजलसाठा योग्य पद्धतीने वापरला, तरच भूस्तरातील पाणीसाठे शाश्वत राहू शकतात. सद्यःस्थितीमध्ये जवळपास ६० ते ६५ टक्के शेती क्षेत्र हे सिंचनाखाली आली आहे. मात्र सिंचनाचे आवर्तन उपलब्ध न झाल्यास शेती क्षेत्राला पाण्याचा मोठा  तुटवडा  जाणवतो.

भूजलाची उपलब्धता

नकाशा क्रमांक २ मध्ये दर्शविल्याप्रमाणे जांभळ्या रंगाचे क्षेत्र जे तडसर गावामध्ये दक्षिण उत्तर व पश्चिम बाजूला आहे. या ठिकाणचा उतार देखील तीन टक्के हून अधिक आहे. त्यामुळे डोंगर माथ्यावरील पर्जन्याचे पाणी वेगाने गावाच्या दिशेने वाहून येते. या पाण्यासोबत येणाऱ्या गाळामुळे गावठाणा शेजारी उत्पादक शेती क्षेत्र ओढ्याच्या कडेला तयार झाले आहे.

नकाशामधील फिक्कट पोपटी रंगाचा भाग हा भूजलाची चांगली उपलब्धता दर्शवितो. उर्वरित तांबड्या रंगाच्या भागातील विहिरींमधील जानेवारी/फेब्रुवारी महिन्यानंतर पाणी आटायला सुरुवात होते. एकूणच शिवारनिहाय पाण्याची उपलब्धता कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येते. त्यामुळे पीक पद्धती ठरविताना भूजलाचा विचार होणे  गरजेचे आहे. राज्यामध्ये अशा प्रकारचे नकाशे प्रत्येक गावांचे उपलब्ध होतात. नकाशांचा वापर आपण पाणलोट क्षेत्र विकास व्यवस्थापनाच्या कार्यक्रमांमध्ये करू शकतो.

भूजलाची उपलब्धता

भूजल

उपलब्धता भौगोलिक

क्षेत्र (हे) एकूण भौगोलिक क्षेत्र (टक्के)

चांगली ४६६ १९

मध्यम स्वरूपात ३४० १४

खूपच कमी ५८९ २३

अत्यल्प १०८६ ४३

गावठाण ७ ००

जलसाठा क्षेत्र २६ १

  २५१४ १००

जमिनीची धूप

नकाशा क्रमांक १ मध्ये दर्शविल्याप्रमाणे तडसर गावच्या गावठाणाच्या परिसरामध्ये व सर्वसाधारणपणे एक ते तीन टक्के उतारा असलेल्या जमिनीमध्ये मध्यम स्वरूपामध्ये धूप होते. ते नकाशामध्ये हिरव्या रंगाने दर्शविण्यात आले आहे. तांबड्या रंगाने दर्शविलेले क्षेत्र हे जास्त प्रमाणामध्ये होणाऱ्या धुपीचे प्रमाण दर्शविते. तर जांभळ्या रंगाचे क्षेत्र हे अति जास्त प्रमाणामध्ये होणाऱ्या धुपीचे क्षेत्र दर्शविते.

भौगोलिक क्षेत्र माहिती प्रणालीमध्ये नकाशात दर्शविल्याप्रमाणे प्रत्येक गावातील जमिनीच्या धुपीचा अंदाज घेता येतो. अति जास्त प्रमाण व जास्त प्रमाणामध्ये (शक्यतो जास्त उताराच्या जमिनी) प्राधान्याने पाणलोट क्षेत्र घेता येतात. पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमांमध्ये शक्यतो क्षेत्रोपचार हे जमिनीची धूप करण्यामध्ये व जलसाठा निर्माण करण्यामध्ये चांगली भूमिका निभावतात. मात्र, दुर्दैवाने राज्यांमध्ये सिमेंट नाला बांध, मातीनाला बांध अशा खर्चिक उपचारांवर भर दिला जातो. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये माती साठवून हे उपचार फलदायी ठरत नाहीत.

राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये हीच परिस्थिती आहे. कोणत्याही गावाचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवत असताना ‘नेट प्लॅनिंग’ केले जाते, ते फक्त ओढे किंवा नाल्यांवरील उपचारांचे. मात्र उर्वरित क्षेत्रीय उपचारांमध्ये सर्वसाधारणपणे फार्म बंडिंग किंवा शेती बांधबंदिस्ती हा एकमेव उपाय सर्वेक्षण न करता नमूद केला जातो. त्यामुळे राज्यामध्ये पाणलोट विकासाचे कामे होऊन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची धूप होत असल्याचे  चित्र आहे.

तडसर  गावामधील  मातीची  धूप

मातीची धूप भौगोलिक क्षेत्र (हे) एकूण भौगोलिक क्षेत्र (टक्के) संकेतांक

कमी प्रमाणात ३०६ १२ e१

मध्यम स्वरूपात ८६० ३४ e२

मध्यम ते जास्त स्वरूपात ५ ० e३

जास्त स्वरूपात ८२० ३३ e४

अति जास्त  प्रमाणात ४९० १९ e५

गावठाण ७ ००

जलसाठा क्षेत्र २६ १

२५१४ १००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT