Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Jaykwadi Water Issue : जायकवाडीच्या पाण्यासाठी किसान सभेचे उद्या सत्याग्रह आंदोलन

Water Crisis : जायकवाडी प्रकल्पासाठी वरच्या धरणातून सुमारे ८.५ टीएमसी पाणी देण्यावरून भाजपच्या वतीने षडयंत्र सुरू आहे.

माणिक रासवे

Parbhani News : जायकवाडी प्रकल्पासाठी वरच्या धरणातून सुमारे ८.५ टीएमसी पाणी देण्यावरून भाजपच्या वतीने षडयंत्र सुरू आहे. त्याविरोधात उद्या, सोमवारी (ता.६) किसान सभेने पाणी हक्काच्या मागणीसाठी गोदावरी मराठवाडा सिंचनविकास महामंडळावर धडक सत्याग्रहाचे आयोजन केले आहे, अशी माहिती किसान सभेचे कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी माहिती दिली.

मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मजनिप्रा (महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण) कायद्याच्या तरतुदीनुसार व उच्च न्यायालयाच्या स्थायी आदेशानुसार जायकवाडी प्रकल्पासाठी वरच्या धरणातून सुमारे ८.५ टीएमसी पाणी देण्याच्या आदेशाला पाटबंधारे मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे आमदार, मंत्री हेच आडवे आले आहेत.

पुन्हा एकदा न्यायालयीन प्रक्रियेत हा प्रश्न गुंतविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. यासाठी सोमवारी (ता.६) किसान सभेने पाणी हक्काच्या मागणीसाठी गोदावरी मराठवाडा सिंचनविकास महामंडळावर धडक सत्याग्रहाचे आयोजन करण्या आले आहे, असे राजन क्षीरसागर यांनी सांगितले.

या आंदोलनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत...

१. समन्यायी पाणीवाटपाबाबत न्यायालयीन तरतुदी व मजनिप्रा कायदा २००५ च्या १२(६) (c) तरतुदीनुसार जायकवाडी प्रकल्पासाठी २० टीएमसी व माजलगाव प्रकल्पासाठी ५ टीएमसी पाणीवाटा वरच्या धरणातून तत्काळ उपलब्ध करावा.

२. जायकवाडी आणि माजलगाव प्रकल्पातील लाभक्षेत्राच्या संपूर्ण क्षेत्रासाठी रब्बी व उन्हाळी १२ पाणी पाळ्या उपलब्ध करावे. गहू, हरभरा, उन्हाळी भुईमुग इत्यादी पिकांसाठी पाणी उपलब्ध करावे.

३. ढालेगाव, तारुगव्हाण, मुदगल, मुळी, दिग्रस, अन्तेश्वर मंगरूळ, सावंगी यांसह ११ बंधाऱ्यांवरील लाभक्षेत्र सिंचित करण्यासाठी या बंधाऱ्यांना जायकवाडीतून १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध करून देण्याची कायमची तरतूद करावी.

४. जायकवाडी प्रकल्प चालविण्यासाठी कपूर कमिशनच्या शिफारशीनुसार आवश्यक अभियंते व कर्मचारी उपलब्ध करावेत. जायकवाडीच्या रिक्त पदांवर रीतसर भरती करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT