Water Crisis : ‘जायकवाडी’साठी पाणी सोडल्यास जलसमाधी

Water Scarcity : नांदूरमध्यमेश्‍वर धरणाच्या वक्राकार गेटसमोर भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अमृता पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Nashik News : मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार मराठवाड्यातील पैठण येथील जायकवाडी धरणातील उपयुक्त साठा १५ ऑक्टोबरच्या स्थितीनुसार ६५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडण्याच्या हालचाली असल्याने शुक्रवारी (ता. २७) नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणीप्रश्‍न पेटला.

नांदूरमध्यमेश्‍वर धरणाच्या वक्राकार गेटसमोर भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अमृता पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले. जायकवाडीसाठी पाणी सोडल्यास त्याच पाण्यात मोठ्या संख्येने जलसमाधी घेण्याचा थेट इशारा पाटबंधारे विभागासह शासनाला शेतकऱ्यांनी दिला.

Water Crisis
Marathwada Water Issue : मराठवाड्याचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार? धरणांतून जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची मागणी

यंदा अल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव, चांदवड, देवळा, बागलाण तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आता मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा पवार यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यास तीव्र विरोध करीत शुक्रवारी गोदापात्रात ठिय्या देत आंदोलन केले.‘जायकवाडी’साठी पाणी सोडल्यास आत्मदहन करू, धरणातच जलसमाधी घेऊ, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यामुळे पाणीप्रश्‍न चिघळण्याची शक्यता आहे.

Water Crisis
Marathwada Water Issue : फक्त आढावा; पाणी सोडण्यावर निर्णय नाही

आतापर्यंत १७ टीएमसी विसर्ग

यंदा राज्यात अल्प पाऊस झाल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट असताना नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून मॉन्सून माघारी गेल्यावरही पूर पाण्याचा २५० क्युसेकने ‘जायकवाडी’च्या दिशेने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. या हंगामात शुक्रवारी सकाळपर्यंत १७ टीएमसी विसर्ग ‘जायकवाडी’त झाला.

आंदोलनात बाबासाहेब गुजर, गोरख गायकवाड, राजाराम मेमाणे, लहानू मेमाणे, केदारनाथ तासकर, शरद शिंदे, मीलन पाटील, अरुण आव्हाड, अंबादास घोटेकर, भागवत वाघ, रवी आहेर, किशोर बोचरे, विलास नांगरे, श्रीहरी बोचरे, अंकुश तासकर, संदीप लोहटकर, दशरथ सांगळे, संजय पगारे, बापू पगारे, रंगनाथ घोटेकर, किरण कुलकर्णी, गोरख कांदळकर आदींनी नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाच वक्राकार गेटसमोर नदीपात्रात उतरून एक तास ठिय्या आंदोलन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com