Election Agrowon
ॲग्रो विशेष

Sarpanch Reservation : मालेगाव तालुक्यातील ‘सरपंच’पदाचे आरक्षण जाहीर

Gram Panchayat Election : मालेगाव तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कार्यकाळात सरपंच पदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

Team Agrowon

Washim News : मालेगाव तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कार्यकाळात सरपंच पदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाच्या नियमानुसार ही आरक्षण प्रक्रिया पार पडली आहे.

यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (एनबीसी), तसेच सर्वसाधारण प्रवर्ग या गटांमध्ये व त्यांच्या महिला राखीव श्रेणींमध्ये पदांचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाच्या दिशानिर्देशांनुसार आरक्षण यादी निश्चित करण्यात आली.

यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार होणारी राजकीय समीकरणे आणि स्थानिक नेतृत्वाचे निर्धारण वेगळे व महत्त्वाचे ठरणार आहे.

आरक्षण प्रक्रियेनुसार खालीलप्रमाणे ग्रामपंचायती विविध प्रवर्गांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत

अनुसूचित जाती (एससी) साठी : सोनाळा, पांगरखेडा, सुकांडा, पिंपळा, शेलगाव, बगाडे, सुदी, भौरद, किन्ही घोडमोड या ग्रामपंचायती आहेत.

अनुसूचित जाती (महिला) साठी : कुत्तरडोह, खैरखेडा, मुसळवाडी, एरंडा, ढोरखेडा, डोंगर किन्ही, वरदरी, वसारी,

अनुसूचित जमाती (एसटी) साठी : पांगरी नवघरे, आमखेडा, सोमठाणा, ईरळा, डव्ही, शेलगाव बोंदाडे,

अनुसूचित जमाती (महिला) साठी : तरोडी, शिरपूर, करंजी, खंडाळा शिंदे, पांगरी धनकुटे, बोरगाव, चिवरा

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीनी) साठी : देवठाणा खांब, वारंगी, मारसुळ, तिवळी, बोराळा जहाँगीर, वाधी बुद्रूक, कोळगाव बुद्रूक, पांगरी कुटे, राजुराराव, एकांबा, दुधाळा

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी : रिधोरा, कुरळा, खडकी इजारा, चांडस, डव्हा, शिरसाळा, रेगाव, काळाकामठा, जामखेड, उडी, गिव्हा

सर्वसाधारण प्रवर्गासाठी : बोराळा, अमाना, केळी, पांगराबंदी, नागरदास, मुंगळा, किन्हीराजा, माळेगाव, कोलदरा, उमरवाडी, वाकळवाडी, भेरा, कोठा, वडप, खिर्डा, वाघळुद

सर्वसाधारण (महिला) साठी : हनवतखेडा, मसला खुर्द, कळंबेश्वर, झोडगा बुद्रूक, मेडशी, ब्राम्हणवाडा, दुबळवेल, जोडगव्हाण, जऊळका, बोर्डी, मैराळडोह, कवरदरी, वाडीरामराव, उमरदरी, गांगलवाडी, अमानी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025: देशात खरीप पेरणीला वेग; कापूस, सोयाबीन, तूर पिछाडीवर

ZP School Admission : झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास होणार कर माफ

Free Sand Policy : घरकुल लाभार्थ्यांना चार टक्केच वाळूचा पुरवठा

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

SCROLL FOR NEXT