Akola News: मिशन ९० दिवस अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या शून्य थकबाकी मोहिमेला महावितरणने अधिक गती दिली आहे. अकोला परिमंडलातील साडेतीन लाखांहून अधिक ग्राहकांकडे सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची थकबाकी असल्याने वीजबिल वसुलीसाठी धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत जवळपास २९ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे..अकोला परिमंडलात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील एकूण ३ लाख ५३ हजार ९२ ग्राहकांकडे १२४ कोटी ५० लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील १ लाख १९ हजार ५६३ ग्राहकांकडे ४५ कोटी २६ लाख रुपये, बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ८२३ ग्राहकांकडे ५७ कोटी १७ लाख रुपये, तर वाशीम जिल्ह्यातील ७९ हजार ७०६ ग्राहकांकडे २२ कोटी ०७ लाख रुपयांची थकबाकी आहे..Power Supply Disconnection: सोलापूर जिल्ह्यातील १९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित.महावितरणने वीजबिल वसुलीसाठी केलेल्या कारवाईत ४४ कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी २८ हजार ९१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात अकोला जिल्ह्यातील ६ हजार ९१५ ग्राहकांकडे ९ कोटी ६४ लाख रुपये थकीत असून त्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १५ हजार ७८५ ग्राहकांचा २८ कोटी ८७ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर वाशीम जिल्ह्यातील ६ हजार २१४ ग्राहकांकडे ६ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचाही वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे..Power Supply Disconnection: छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील २२ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित.ज्या गावांमध्ये वीजबिल वसुलीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, त्या ठिकाणी महावितरणकडून सामूहिक मोहिम राबवून थेट मीटर काढून आणण्याची कारवाई केली जात आहे. आर्थिक वर्ष संपण्यास केवळ २० दिवस उरले असल्याने सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वीजबिल वसुली मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. .थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास सिंगल फेज जोडणीसाठी ३१० रुपये व थ्री फेज जोडणीसाठी ५२० रुपये पुनर्जोडणी शुल्क आकारले जाते. त्यामुळे हा भुर्दंड टाळण्यासाठी ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरावे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. तसेच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर शेजाऱ्यांकडून अनधिकृत वीज घेणे बेकायदेशीर आहे. असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच अनधिकृत वीज देणाऱ्या शेजाऱ्याचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.