Salokha Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Salokha Scheme : सलोखा योजनेअंतर्गत १०२१ दस्तांची नोंदणी

Registration Process : राज्यात सलोखा योजनेअंतर्गत १०२१ दस्त नोंदविले आहेत. त्यामुळे एकूण मुद्रांक शुल्कात सात कोटी ८८ लाख रुपयांची, तर नोंदणी फीमध्ये एक कोटी २६ लाख रुपयांची अशी एकूण नऊ कोटी १४ लाखांची माफी मिळाली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : राज्यात सलोखा योजनेअंतर्गत १०२१ दस्त नोंदविले आहेत. त्यामुळे एकूण मुद्रांक शुल्कात सात कोटी ८८ लाख रुपयांची, तर नोंदणी फीमध्ये एक कोटी २६ लाख रुपयांची अशी एकूण नऊ कोटी १४ लाखांची माफी मिळाली आहे. या योजनेमुळे शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबतचा वाद सुटत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नाममात्र एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि एक हजार रुपये मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनीची अदलाबदल करण्याची संधी मिळणार आहे. ही योजना दोन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे.

पुणे विभागांतर्गत पुणे जिल्ह्यात एकूण २७, सातारा जिल्ह्यात ४६, सांगलीमध्ये ४६, सोलापूरमध्ये १५ आणि कोल्हापूरमध्ये ३१ दस्त सलोखा योजनेअंतर्गत नोंदविले गेले आहेत. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण १६६ दस्त नोंदविले गेले असून, त्यांना एकूण २० लाख ६३ हजार ३१० रुपयांची माफी मिळाली आहे.

सलोखा योजनेच्या अटी...

शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षांपासून असला पाहिजे

या योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूंकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला, तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील.

अकृषिक, रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनींसाठी ही योजना लागू राहणार नाही.

पंचनामा प्रमाणपत्र अदलाबदल दस्तास जोडणे आवश्यक आहे.

दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवीत आहे, अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे.

वस्तुस्थितिदर्शक पंचनामा मंडल अधिकारी व तलाठी यांनी नोंदवून घेणार असून, पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT