Salokha Yojana : सलोखा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ः जिल्हाधिकारी परदेशी

Hingoli News : दोन गट क्रमांकामध्ये परस्पर ताबा असलेल्या शेतकऱ्यांसाठी सलोखा योजना राबविली जात आहे.
Salokha Yojana
Salokha Yojana Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Salokha Scheme : हिंगोली ः दोन गट क्रमांकामध्ये परस्पर ताबा असलेल्या शेतकऱ्यांसाठी सलोखा योजना राबविली जात आहे. गेल्या १२ वर्षांपासून दोन गट क्रमांकामध्ये परस्पर ताबा असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित गावाचे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून पंचनामा करून घ्यावेत.

या योजनेअंतर्गत संपूर्ण मुद्रांक शुल्काऐवजी केवळ १ हजार १०० रुपये व नोंदणी शुल्क भरून आदला बदली अभिलेख दस्त तयार करून घ्यावेत, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले.

उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात बुधवारी (ता. १४) अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली सलोखा योजना, बळीराजा सामाजिक आर्थिक सर्व्हेक्षण, संगणकीय सातबारा दुरुस्ती, गाव नकाशाप्रमाणे पांदण रस्ते मोकळे करणे याबाबत आढावा घेण्यात आला.

या वेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी नवनाथ वगवाड, सेनगावचे तहसीलदार सखाराम मांडवगडे, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार पी. एन. ऋषी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

सलोखा योजनेचा लाभ घेतलेले लोहगाव (ता. हिंगोली) येथील लाभार्थी शेतकरी रामराव विश्‍वनाथ सावळे यांच्या नावे असलेली जमीन जिचा प्रत्यक्ष ताबा गोकर्णा बाबूराव सावळे यांचा होता.

परस्पर दोन गटांतील आदलाबदली करण्यासाठी नियमानुसार अंदाजे ६० हजार रुपये शुल्क भरावे लागले असते.

परंतु या योजनेतून त्यांना संपूर्ण मुद्रांक शुल्काच्या ऐवजी केवळ १ हजार १०० रुपये व नोंदणी शुल्क भरून आदलाबदली लेख तयार करून त्यांची प्रत परदेशी यांच्या हस्ते संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली.

लोहगाव येथील श्यामराव तुकाराम सावळे व रामचंद्र पुंजाजी सावळे यांनाही दस्ताची प्रत देण्यात आली. तलाठी गजानन रणखांब, मंडळ अधिकारी आर. डी. दराडे यांनी गावात जाऊन या योजनेची प्रसिद्धी केली.

बळीराजा आर्थिक व सामाजिक सर्व्हेक्षणाबाबत तालुकानिहाय संबंधित तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे उर्वरित कामे दोन दिवसांत पूर्ण करावीत. गाव नकाशाप्रमाणे सर्व पांदण रस्ते मोकळे करण्याचे निर्देश दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com