
Latur News : लातूर : ‘महावितरण’ने ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढावी यासाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरू केली आहे. या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत.
१ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन किंवा तीन पेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना देण्यात आली आहे. ग्राहकांना ‘लकी ड्रॉ’व्दारे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
ही योजना ‘महावितरण’च्या लघुदाब चालू वीजग्राहकांसाठी लागू असेल. ज्यांनी ता.एक एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही ऑनलाइन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही, त्यांच्यासाठी ही योजना आहे.
लकी ड्रॉ काढून स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे ग्राहकांना दिली जाणार आहेत. ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘महावितरण’च्या वतीने करण्यात आले आहे.
रांगेत उभे राहण्यापेक्षा डिजिटल पद्धतीने वीज बिल भरणा करण्यास ग्राहक प्राधान्य देत आहेत. यामुळे वेळ, श्रम व पैशांची बचत होत आहे. ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी ‘महावितरण’कडून संकेतस्थळ, मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रकमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात ७० टक्क्यांहून अधिक वीज ग्राहक ऑनलाइन पद्धतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.