Plant Based Processing Products: विविध प्राण्यांपासून मिळविलेले दूध व त्यापासून बनविलेली विविध उत्पादने ही माणसांच्या प्रथिनांचा मुख्य स्रोत राहिलेली आहेत. मात्र आरोग्य आणि नैतिक कारणामुळे प्राणिज दुधाचा वापर कमी करण्यासाठी अनेक लोकांचा कल वाढत आहे. अशा व्हेगन लोकांसाठी विविध वनस्पतींच्या बियांपासून दूध व तत्सम पदार्थांची निर्मिती केली जात आहे. या नवीन सेगमेंटमध्ये वनस्पतिजन्य दुधाचे अनेक ब्रॅण्ड उतरताना दिसत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून या उत्पादनाच्या विक्रीमध्ये घट होताना दिसत आहे. त्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न...
वनस्पतिजन्य दूध आणि तत्सम उत्पादने ही प्रामुख्याने उच्च मूल्याच्या सेगमेंटमध्ये बाजारात आणली जात आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये वनस्पतिजन्य दूध या वर्गवारीमधील उत्पादनांच्या विक्रीमध्ये घट दिसून येत आहे. या नव्या मार्केट सेगमेंटमध्ये शिरकाव करताना ग्राहकाच्या जनजागृतीची जोड देण्याची आवश्यकता आहे.
कारण ग्राहकांमध्ये या दुधाची पोषकता, निर्मितीची प्रक्रिया याबाबत शंका असल्याचे दिसून आले. त्यामुळे या मार्केटमधील काही कंपन्या उदा. कॅलिफिया फार्म्स, आल्महर्ट १९२५, व्हर्जिनिया डेअर आणि ओटली आपल्या उत्पादनांच्या यादीमध्ये (पोर्टफोलिओ) वाढ करत असून, ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या ‘नॅचरल प्रोडक्ट्स एक्स्पो वेस्ट’मध्ये आला.
‘स्पिन्स म्युलो’ने दिलेल्या माहितीनुसार, शीत पेय आणि सामान्य स्थितीतील वनस्पतिजन्य दुधाच्या विक्रीमध्ये गेल्या काही वर्षांत सातत्याने घट होते. डिसेंबर अखेर ही घट ४.७ टक्के नोंदविली गेली. शीतदुधाची विक्रीमध्ये २०२३ मधील ४.९ टक्के (२.६३ अब्ज डॉलर) पासून घसरून २०२४ मध्ये २.५ अब्ज डॉलर झाली. त्याच वेळी सामान्य स्थितीतील वनस्पतिजन्य दुधाच्या विक्री २०२३ मधील ३१७ दशलक्ष डॉलरवरून घसरून ३०९ दशलक्ष डॉलरवर (२.४ टक्के घट) पोहोचली होती. याच कालावधीमध्ये वनस्पतिजन्य दुधाची मिश्रणे (ब्लेंड्स), नारळ दूध, सोय यामध्ये अनुक्रमे १०.३ टक्के, २७.५ टक्के आणि ०.७ टक्का वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सेंद्रिय म्हणून प्रीमिअम दरासाठी दावा
सेंद्रिय व्यापार असोशिएशन आणि युरोमॉनिटर यांच्या अभ्यासानुसार, नव्या पिढीतील (जेन झेड आणि मिल्लेनिअल्स) लोक सेंद्रिय उत्पादनासाठी अधिक दर मोजण्याची तयारी दाखवतात. त्यामागे त्यांची पोषक अन्न, पर्यावरणपूरकता, सामान्य कामगारांना मिळणारे फायदे यांना पसंती दिली जाते. विविध संजीवके, कीडनाशके आणि प्रतिजैविकांना टाळण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत असल्याचे अभ्यास स्पष्ट झाले.
यावर भाष्य करताना ‘कॅलिफिया फार्म्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिट्टरबुश यांनी सांगितले, की आमच्या कंपनीच्या वतीने वनस्पतिजन्य उत्पादनांना साध्या आणि सेंद्रिय उत्पादनांच्या यादीमध्ये समाविष्ट करत आहोत. ग्राहकांची मागणी कमीत कमी प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना मिळत आहे. त्यातील घटक पदार्थांची संख्याही तीन ते चार इतकीच (बदाल, नारळ, काजू आणि ओट) ठेवली आहे. या सर्व दुधाच्या बाटल्यावर यूएसडीए - ऑरगेनिकचा लोगोही वापरला जात आहे.
‘व्हर्जिनिया डेअर’चे सेंद्रिय स्वाद, अर्क
व्हर्जिनिया डेअर कंपनीने आजवर सुमारे २५० सेंद्रिय स्वाद आणि अर्क बाजारात आणलेले आहेत. वनस्पतिजन्य दुधाचा सामान्य गाईच्या दुधापेक्षा असलेला वेगळा स्वाद कमी करण्यासाठी हे सेंद्रिय स्वाद नक्कीच उपयोगी पडू शकतील, अशी माहिती त्यांच्या विपणन विभागाच्या फिलिप कॅप्युटो यांनी दिली.
इल्महर्ट नवे संशोधन घेऊन बाजारात
१९१७ पासून वनस्पती दूध, क्रिमर्स, कॉफी उत्पादनामध्ये कार्यरत कंपनी ‘इल्महर्ट १९२५’ ही बाजारातील हिस्सा वाढविण्यासाठी अन्य उत्पादनामध्ये उतरण्याचा विचार करत आहे. त्यासाठी त्यांनी अन्न शास्त्रज्ञ चेरिल मिटचेल यांनी विकसित केलेल्या जलआधारीत (हायड्रोरिलिज) तंत्रज्ञानाच्या वापराचा निर्णय घेतला आहे. या तंत्रज्ञानामुळे बिया, धान्य आणि सुक्या मेव्यातील पोषक घटक वेगळे करणे किंवा जे सामान्यतः एकत्र न होऊ शकणारे घटकही एकत्रित एकजीव (इमल्सिफाय) करणे शक्य होते. त्यामुळे ही उत्पादने मऊसूत, क्रिमी होतात. त्यासाठी वेगळे पूरक घटक (इमल्सिफायर) मिसळण्याची गरज राहत नाही.
कंपनी पेयाव्यतिरिक्त अन्य उत्पादनांमध्येही उतरत आहे. त्यांनी गेल्या वर्षी वनस्पतिआधारीत सौर क्रीम पाऊच स्वरूपामध्ये बाजारात आणले होते. या सौर क्रीममध्ये ओटपासून बनवलेले दूध आणि हेम्प प्रथिनांचा समावेश आहे. हे एक नॉन जीएमओ, अधिकृत, ग्लुटेनफ्री, ओयू कोशेर आणि प्रमाणित व्हेगन उत्पादन आहे.
ग्राहकांच्या शंकांना उत्तरे देण्यासाठी ओटलीज् न्यूट्रिशन बुक
ओटलीज् या कंपनीने कोणत्याही बाह्य शर्करायुक्त पदार्थांशिवाय ओट दूध बाजारात आणले आहे. हे उत्पादन केवळ ४ घटकांपासून बनवले आहे. त्यात शासकीय मार्गदर्शन सूचनांप्रमाणे योग्य त्या जीवनसत्त्वांचा समावेश केला आहे. सामान्य लोकांच्या मनामध्ये असलेल्या शंकांना उत्तर देण्यासोबतच ओट दुधाच्या निर्मितीची माहिती पोचविण्यासाठी ओटली्ज न्यूट्रिशन बुक प्रकाशित केल्याची माहिती ख्रिस लिंग यांनी दिली. त्यातून प्रक्रियायुक्त पदार्थ म्हणजे वाईटच किंवा आरोग्याला घातकच हा समज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. अतिप्रक्रियायुक्त (अल्ट्राप्रोसेस्ड) उत्पादनांपासून या वनस्पतिजन्य दूध व संबंधित उत्पादनांचे वेगळेपण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.