sheep Goat Agrowon
ॲग्रो विशेष

Goat-Sheep Market : यात्रा उत्सवांमुळे शेळ्या-मेंढ्यांच्या विक्रीत वाढ

Livestock Market : सध्या अनेक गावांमध्ये यात्रा उत्सव चालू असल्याने येथील उपबाजारात शेळी, बोकड व मेंढीची आवक मोठ्या प्रमाणात होऊन विक्री ही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

Team Agrowon

Pune News : येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात शेळ्या-मेंढ्यांची मोठ्या प्रमाणात आवक व विक्री झाली असल्याची माहिती प्रशासक अरुण साकोरे, सचिव अनिल ढोकले यांनी दिली. येथील बाजारात एका मेंढीची विक्री किंमत ४ ते ९ हजार रुपयापर्यंत तर शेळीची किंमत ८ ते १६ हजार रुपयांपर्यंत झाल्याची माहिती बाजार समितीने दिली.

सध्या अनेक गावांमध्ये यात्रा उत्सव चालू असल्याने येथील उपबाजारात शेळी, बोकड व मेंढीची आवक मोठ्या प्रमाणात होऊन विक्री ही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

शेळी-मेंढीच्या विक्रीतून समाधानकारक उत्पन्न मिळत असल्याने पशुपालक व शेतकरी वर्ग समाधानी आहे. येथील बाजारात शिरूर- हवेली तालुक्यासह पुणे व नगर जिल्ह्यांतून शेळी- मेंढी विक्रीसाठी पशुपालक येत असतात.

येथील बाजारात कडक उन्हाळ्यात बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांसह पशुधनाला पिण्यासाठी पाण्याची सोय केली आहे. यामुळे दिलासा मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

तसेच येथील बाजारात मुंबई, पुणे, सोलापूर, नगर, रायगड, सातारा आदी जिल्ह्यांतून व्यापारी शेळी, बोकड व मेंढी खरेदी करण्यासाठी आल्याने चांगले दर मिळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT