Goat Farming : उन्हाळ्यात शेळ्यांना कसा आहार द्याल?

Team Agrowon

शेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते. शेळ्यांना दररोज पाच किलो हिरवा चारा, एक किलो वाळलेल्या चाऱ्याची गरज असते.

Goat Farming | Agrowon

शेळीला तिच्या वजनाच्या चार ते पाच टक्के शुष्क पदार्थांची आवश्यकता असते.

Goat Farming | Agrowon

पशुखाद्याचा विचार केला सुक्या चाऱ्यामध्ये ८९ टक्के आणि हिरव्या चाऱ्यामध्ये २० टक्के शुष्क पदार्थ असतात. एकदल धान्य पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सात ते अकरा टक्के असते.

Goat Farming | Agrowon

वाळलेल्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चार ते सहा टक्के असते. एकूण पचनीय पोषक तत्त्वांचे प्रमाण ५० ते ५५ टक्के असते. एकदल चारा पिकांमध्ये मका, कडवळ, बाजरी, ज्वारी, दशरथ घास, गिनी गवत इत्यादींचा समावेश होतो.

Goat Farming | Agrowon

द्विदल चारा पिकांमध्ये लसूण घास, बरसीम, भुईमूग, चवळी, सोयाबीन इत्यादी चारा पिकांचा समावेश होतो.

Goat Farming | Agrowon

आहारामध्ये वाळलेला चारा, हिरवा चारा, खुराक, जवस आणि गव्हाचा कोंडा वापरावा. खाद्यामध्ये खनिजाची थोडीशी मात्रा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.

Goat Farming | Agrowon

शेळ्यांसाठी चारा म्हणून सुबाभूळ, शेवरी, अंजन वृक्ष, डीएचएन ६, गिनी गवत, पॅरा गवत, नेपियर, सुदान गवत, दीनानाथ गवत, मारवेल इत्यादी चाऱ्याची लागवड करावी.

Goat Farming | Agrowon