Cotton Seeds  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seeds : कपाशीच्या विशिष्ट वाणांच्या बियाण्यांची जादा दराने विक्री

Cotton Seeds Sale : परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून अधिक मागणी असलेल्या कपाशीच्या विशिष्ट वाणांच्या बियाणे पाकिटांची किमान किरकोळ किंमतीपेक्षा जादा दराने विक्री केली जात आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून अधिक मागणी असलेल्या कपाशीच्या विशिष्ट वाणांच्या बियाणे पाकिटांची किमान किरकोळ किंमतीपेक्षा जादा दराने विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतरही कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना ऑनने बियाणे खरेदीचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ९२ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने ११ लाख ८३ हजार बियाणे पाकिटांची मागणी केली. कृषी आयुक्तालयाच्या प्लॅननुसार ८ लाख ९५ हजार ७२२ बियाणे पाकिटांच्या पुरवठ्याचे निर्देश आहेत. सोमवारपर्यंत (ता. १०) ७ लाख ५५ हजार ८५२ बियाणे पाकिटांचा पुरवठा झाला. यंदा साधारणपणे १६ मे पासून कपाशीच्या बियाण्यांची विक्री सुरू झाली. आजवर ३ लाख २० हजार बियाणे पाकिटांची विक्री झाली.

त्यात शेतकऱ्यांकडून जास्त मागणी असलेल्या विशिष्ट वाणांच्या पाकिटांची संख्या अधिक आहे. यंदा सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणच्या विक्रेत्यांकडून विशिष्ट वाणांच्या बियाणे पाकिटांची साठेबाजी करून काळाबाजार केला जात आहे. बी.टी. कपाशी पाकिटाची किमान किरकोळ किंमत (एमआरपी) ८६४ रुपये असताना विशिष्ट वाणांचे बियाणे पाकिटामागे ४०० ते ५०० रुपये जास्तीचे घेतले जात आहेत. पावती मात्र एमआरपीचीच दिली जात असल्याच्या तक्रारी विविध तालुक्यांतील शेतकरी करत आहेत.

अनेक कृषी सेवा केंद्रांवरील दर्शनी भागातील फलकावर बियाणे साठा, पुरवठा, विक्री, उपलब्धता यांची माहिती अद्ययावत केली जात नाही. त्यामुळे त्या कृषी सेवा केंद्रांवर उपलब्ध बियाणे वाणांची माहिती सहज मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. जिल्हा, तालुका स्तरावर असलेल्या कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून आजवर कोणतीही कारवाई केल्याचे दिसत नाही. गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेतील जबाबदार अधिकारी, कर्मचारी नॉट रिचेबल असतात. शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून नाहीत. कृषी निविष्ठांचा काळाबाजार कोण थांबविणार? असा सवाल शेतकरी करत आहेत.

बियाणे, खते, कीटकनाशके यांची खरेदी करतेवेळी पावती घ्यावी. जपून ठेवावी. कृषी निविष्ठांसाठी जास्त दर आकारत असलेल्या विक्रेत्यांच्या लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे कराव्यात. दोषी विक्रेत्यांविरुद्ध वर्षभरासाठी परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाईल.
अनिल गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तथा जिल्हा परवाना अधिकारी, परभणी
कपाशीच्या विशिष्ट वाणांच्या बियाण्यांची जादा दराने विक्री करून विक्रेते नफा कमवत आहेत. खताबरोबरच लिंकिंग केली जाते. ही बाब सातत्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या निर्दशानास आणून दिल्यानंतरही कोणतीही कारवाई केली जात नाही.
विश्वंभर गोरवे, शेळगाव, ता. सोनपेठ, जि. परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT