PDKV Akola  Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV Akola : कृषी विद्यापीठनिर्मित उत्पादनांची विक्री सुरू

Agriculture University : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठनिर्मित विविध उत्पादने तथा प्रक्रियायुक्त पदार्थ ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावीत या हेतूने विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठनिर्मित विविध उत्पादने तथा प्रक्रियायुक्त पदार्थ ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावीत या हेतूने विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या खाद्य पदार्थांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

राष्ट्रीय महामार्गावरील क्रीडांगणाच्या समोरील बाजूच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला विद्यापीठ उत्पादित निविष्ठा विक्री केंद्राचे उद्‌घाटन कुलगुरू डॉ. गडाख यांनी केले. या प्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉ. श्‍यामसुंदर माने, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कुलसचिव सुधीर राठोड, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे, निम्न कृषी शिक्षण शाखेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र काटकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे उपस्थित होते.

या विक्री केंद्रावर कृषी महाविद्यालयातील उद्यानविद्या आणि कृषी अभियांत्रिकी शाखेद्वारा उत्पादित फळे, भाजीपाला, फुले व कडधान्य जसे ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादींपासून तयार केलेले व उपलब्ध असलेले प्रक्रियायुक्त पदार्थ, वेगवेगळे सीरप, जाम, जेली, टॉफी, लोणचे, चटणी, केचप, कुकीज, पाव, ब्रेड, टोस्ट, खारी, करडई तेल, शेंगदाणा तेल, जवस तेल आदी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार असल्याचे डॉ. गाडे यांनी सांगितले.

विक्री केंद्राची संकल्पना कुलगुरू डॉ. गडाख यांची आहे. उद्यानविद्या शाखेचे प्रमुख डॉ. सुधीर दलाल, डॉ. अतुल वराडे, डॉ. योगिता सानप, डॉ. प्रवीणा सातपुते तसेच कृषी अभियांत्रिकी शिक्षण शाखा प्रमुख डॉ. संतोष दिवेकर, डॉ. विवेक खांबलकर, कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राजेंद्र वाळके, डॉ. मंगला घनबहादूर, डॉ. मोहन तोटावार, डॉ. संजय कोकाटे, डॉ. गिरीश जेऊघाले यांच्यासह इतर प्राध्यापक, कर्मचारी विक्री केंद्र व्यवस्थापनासाठी प्रयत्नशील आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT