PDKV Akola : ‘पंदेकृवि’ला तीन नव्या प्रकल्पांना मान्यता

Agriculture University : कृषी विद्यापीठात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ‘सुधारित फळ पिकांतर्गत मोठ्या प्रात्यक्षिक आणि व्यावसायिक शेतीचा विकास’ हा प्रकल्प राबविण्यास प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे.
PDKV Akola
PDKV Akola Agrowon
Published on
Updated on

Akola News : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आगामी काळात वेगवेगळे तीन प्रकल्प राबवण्यास मान्यता देण्यात आली असून, यासाठी सुमारे ११ कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. संशोधनाच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे मानले जातात.

कृषी विद्यापीठात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ‘सुधारित फळ पिकांतर्गत मोठ्या प्रात्यक्षिक आणि व्यावसायिक शेतीचा विकास’ हा प्रकल्प राबविण्यास प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या ३४ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या बैठकीत प्रकल्प ‘पंदेकृवि’मध्ये २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठी प्रकल्पात मान्यता देण्यात आली. यासाठी सात कोटी ४७ लाख रुपये मंजूर करण्यात आले.

PDKV Akola
PDKV Akola : पैदासदार बियाण्यासाठी ‘पंदेकृवि’ची धडपड

अत्याधुनिक बियाणे तपासणी लॅब

उपरोक्त समितीच्या बैठकीत विद्यापीठाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अत्याधुनिक बियाणे तपासणी प्रयोगशाळेसाठी मान्यता देण्यात आली. दोन कोटी ४ लाख रुपये यासाठी मंजूर झाले आहेत. यातून Establishment of advanced seed testing by strenghthning of notified seed testing leboratory उभारली जाईल.

तृणधान्य उत्पादन, उत्पादकता वाढविण्यासाठी बियाणे उत्पादन प्रकल्प

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त सध्या तृणधान्यांचा बोलबाला सुरू आहे. पोषणमूल्यांमुळे या धान्यांची मागणीही समाजात वाढते आहे. आजवर दुर्लक्षित असलेल्या या धान्यांचा वापर वाढत असल्याची चांगली बाब लक्षात घेता आता या तृणधान्यांचे बियाणे उत्पादन वाढीसाठी खास प्रकल्प पंदेकृविमध्ये राबवला जाणार आहे.

PDKV Akola
PDKV, Akola : ‘पंदेकृवि’मध्ये भरडधान्यांच्या पदार्थांसह कृषिजीवनाचा जागर

या प्रकल्पासाठी शासनाने दोन कोटी चार लाख रुपये प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीतून तृणधान्य बियाणे वाढीसाठी खास प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात तृणधान्यांचे बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यास हातभार लागू शकेल. हा प्रकल्प विद्यापीठाच्या संशोधन संचालकांच्या अखत्यारीत राबवला जाईल.

विदर्भातील शेतीच्या दृष्टीने भविष्यातील गरज लक्षात घेऊन विद्यापीठाने कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात शासनाकडे संशोधनपर प्रकल्प सादर केले होते. त्याला मंजुरी मिळाली आहे. आपल्याकडील सुविधा व कृषी हवामानाला पोषक मिलेटवर एक प्रकल्प आहे. आपल्याकडे मोनोक्रॉपिंग असल्याने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पीक विविधता गरजेची आहे. आपण फूड सेक्युरिटीचे उद्दिष्ट गाठले आहे. आता न्यूटीशनल सेक्युटरीसाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठ संत्रा, मोसंबी, पेरू, कोरडवाहू फळपिके लावत आहे. त्यादृष्टीने हे प्रकल्प सादर केले होते. त्याला मंजुरी मिळाली. त्यादृष्टीने संशोधनात्मक काम पुढे नेणार आहे.
-डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, पंदेकृवि, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com