Nishigandha Flower  Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Variety : निशिगंधाचे ‘सह्याद्री वामन’ वाण शेतकऱ्यांना होणार उपलब्ध

Nishigandha Flower : हा वाण उंचीने केवळ ५० सेंटिमीटर आहे. कुंडीत लागवडीसाठी अतिशय उपयुक्त आहे. तर फुलधारणा झाल्यानंतर पुढील तीन वर्षे हे झाड उपयुक्त असेल.

गणेश कोरे

Pune News : फूल उत्पादकांसाठी विविध फुलांचे नवनवीन वाण विकसित करून, त्याचा व्यावसायिक वापर होऊन, बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने पुष्प संशोधन संचालनालयाने निशिगंधाचा फुलदाण्यांमध्ये (फ्लॉवर पॉट) लागवड होणारा आणि जास्त सुंगध देणारा ‘सह्याद्री वामन’ हा नवीन वाण विकसित केला आहे. या वाणाचे व्यावसायिकीकरण करण्यात आले असून, हा वाण आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबतचा सामंज्यस्य करार नुकताच झाला आहे.

याबाबत संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही प्रसाद म्हणाले, ‘‘पुष्प संशोधन संचालनालयाकडून पारंपरिक फुलांपेक्षा आता ग्राहक, बाजारपेठेच्या मागणीनुसार नवनवीन वाण विकसित करण्यात येत आहेत. यामध्ये निशिगंधाच्या लहान कुंडीमध्ये लागवड करणाऱ्या आणि घरात, हॉटेल, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सुगंधी ताजी फुले उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने गेल्या ८ वर्षांपासून या वाणावर संशोधन सुरू होते.

पाच वर्षांच्या संशोधन आणि ३ वर्षांच्या विविध चाचण्यांनंतर आता हा ‘सह्याद्री वामन’ शेतकऱ्यांना आणि नर्सरी उद्योगासाठी मिळेल. या वाणाच्या व्यावसायिकरणासाठी स्विफ्ट ॲग्रो केमिकल्स अॅण्ड न्यूट्रिएंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.’’

‘‘हा वाण उंचीने केवळ ५० सेंटिमीटर आहे. कुंडीत लागवडीसाठी अतिशय उपयुक्त आहे. तर फुलधारणा झाल्यानंतर पुढील तीन वर्षे हे झाड उपयुक्त असेल. या करारामुळे या वाणाचे दर्जेदार कंद शेतकऱ्यांना मिळतील.

हा वाण कुंड्यांसाठी विकसित केला आहे. निशिगंधाचा पुष्पगुच्छ बनविण्यासाठी तो वापरला जाईल. पारंपरिक वाण केवळ शेतीमध्ये लागवड केले जातात. त्यांची उंची ३ फुटांपेक्षा अधिक असल्याने कुंडीमध्ये लागवड होऊ शकत नव्हती. आता घरामध्ये कुंडीत लागवड करता येईल,’’ असे डॉ. प्रसाद म्हणाले.

...अशा केल्या चाचण्या

निशिगंधाचा वाण पुष्पसंशोधन संचालनालयाच्या पुणे येथील प्रयोगशाळेत विकसित करण्यात आला. तर याच्या चाचण्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि राजस्थानपासून ते पश्‍चिम बंगालपर्यंत विविध ८ प्रक्षेत्रांवर घेण्यात आल्याचे संचालनालयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. गणेश कदम यांनी सांगितले.

‘सह्याद्री वामन’ची वैशिष्ट्ये

- कुंडीत लागवडीसाठी होणार उपलब्ध

- उंची केवळ ५० सेंटिमीटर

- लागवड केल्यावर पुढील ३ वर्षांपर्यंत उत्पादन देणार

- एकावेळी एका काडीवर ४२ ते ५२ फुले उमलतात

- फुलांची टिकवणक्षमता १५ दिवसांपर्यंत राहणार

- घरात, कार्यालयात, हॉटेल, तारांकित हॉटेलमधून मोठी मागणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT