Marigold Flower Farming : ड्रॅगन फ्रूटमध्ये झेंडूचे आंतरपीक ठरले फायदेशीर

Marigold Production : उत्तर प्रदेशातील कुरौना (जि. भदोही) येथील सीमांत मिश्रा या तरुणाने ड्रॅगन फ्रूट लागवडीमध्ये झेंडूसह भाजीपाला उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला आहे.
Dragon Fruit and Marigold Flower
Dragon Fruit and Marigold FlowerAgrowon
Published on
Updated on

Agriculture Experiment Success Story : भाजीपाला पिकांमध्ये तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वाराणसी येथील भारतीय भाजीपाला पीक संशोधन संस्था मोलाचे योगदान देत आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी, भदोही, देवरिया आणि कुशीनगर जिल्ह्यांतील कृषी विज्ञान केंद्रांची मदत घेतली आहे.

विविध प्रकारच्या फळबागांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये भाजीपाल्यासह झेंडूसारख्या फुलपिकांच्या आंतरपीक पद्धतीला चालना दिली जात आहे. त्यातून तरुण शेतकऱ्यांमध्ये कृषी आधारित उद्योजकतेच्या विकासाला प्रोत्साहन दिले जात आहे. या शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी दूर करण्यामध्ये संशोधन संस्थेसोबतच कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ मोलाची भूमिका निभावत आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या अनेक यशकथा विविध जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहेत.

Dragon Fruit and Marigold Flower
Flower Farming : भातशेतीला पॉलिहाउसमधील गुलाबशेतीची जोड

ड्रॅगन फ्रूटमध्ये झेंडूचे आंतरपीक :

उत्तर प्रदेशातील कुरौना (जि. भदोही) येथील सीमांत मिश्रा या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाने वडिलांसोबत भदोही येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली होती. त्या वेळी त्याला ड्रॅगन फ्रूट या नवीन फळपिकाविषयी समजले. मग तेथील तज्ज्ञांसोबत जिल्हा फलोत्पादन विभाग आणि विविध समाजमाध्यमे, वर्तमानपत्रातून ड्रॅगन फ्रूट लागवडीविषयी अधिक माहिती मिळवली.

थोडे धाडस करत जुलै, २०२२ मध्ये ०.२५ हेक्टर क्षेत्रामध्ये सिंमेटचे १११ खांब उभारून, प्रति खांब ४ रोपे याप्रमाणे ४४४ रोपांची लागवड केली. सामान्यतः ड्रॅगन फ्रूट लावल्यानंतर दोन वर्षांनी फुलधारणा होते. त्यामुळे पहिल्या वर्षी दोन ओळींमधील मोकळ्या जागेत कोणते आंतरपीक करता येईल, याचा विचार सुरू केला. कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांसोबत चर्चेतून विविध भाजीपाल्यांचा पर्याय समोर आला.

Dragon Fruit and Marigold Flower
Marigold Cultivation : सातत्यपूर्ण लागवडीतून मिळवली ‘मास्टरी’

विशेषतः कोथिंबीर, मिरची, टोमॅटो, मेथी या भाजीपाला पिकांसह झेंडूचे आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला. या पिकातील वाण निवड, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पीक संरक्षण यासाठी केव्हीकेमधील तज्ज्ञांची मोठी मदत झाली. भाजीपाला उत्पादनातून दैनंदिन घरगुती भाजीपाल्याची गरज भागली. त्यामुळे वार्षिक खर्चात सुमारे २ हजार रुपयांची बचत झाली. कोथिंबिरीपासून साधारणपणे ८ किलो धने मिळाले.

त्यातून ६४० रुपये उत्पन्न मिळाले. झेंडू फुलांनाही २० ते ३० रुपये प्रति किलो असा दर मिळाला. त्यातून तीन महिन्यांमध्ये त्यांना २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. उत्पादन खर्च वजा जाता सुमारे १५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला. फायदा व खर्च यांचे गुणोत्तर (BC Ratio) १.६७ असे आले असून, फळपिकामध्ये आंतरपिकांच्या या प्रयोगातून लक्षणीय फायदा हाती येत असल्याचे सिद्ध झाले.

झेंडू आंतरपिकासाठी केलेल्या संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा फायदा ड्रॅगन फ्रूटच्या रोपांनाही झाला. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटलाही प्रति झाड साधारणपणे २२ ते २५ फळे मिळाली. एकंदरीत ही आंतरपीक पद्धती एकमेकांना पूरक ठरली असून, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरल्याचे सीमांत मिश्रा यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा झेंडूच्या साडेतीन हजार रोपांची लागवड केली. त्याच प्रमाणे टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि मेथी या भाजीपाला पिकांची स्वतंत्र क्षेत्रामध्ये लागवड केली आहे. परिसरात नवीनच असलेल्या ड्रॅगन फ्रूट व आंतरपीक लागवडीचा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी सीमांत मिश्रा यांच्या शेतीला भेटी देत आहेत.

(स्रोत : आयसीआर- भारतीय भाजीपाला पीक संशोधन संस्था, वाराणसी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com