District Bank
District Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli District Bank : सह्याद्री मोटर्स, स्वप्नपूर्ती शूगर सांगली जिल्हा बॅंकेच्या ताब्यात

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Sangli District Central Cooperative Bank) थकीत कर्ज वसुलीसाठी (Loan recovery) स्वप्नपूर्ती शुगर व सह्याद्री मोटर्सचा ताबा घेतला आहे. सह्याद्री मोटर्सकडे ५५ कोटी, तर स्वप्नपूर्ती शुगरकडे २३ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे.

वर्षाखेरपूर्वीच जिल्हा बॅंक प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. सर्व बड्या थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. संस्थांच्या मालमत्ताही ताब्यात घेणार असल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बॅँकेच्या संचालक मंडळाची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. यात सर्वच बड्या आस्थापनांना मार्चअखेर थकबाकी भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत बोलणीही युद्ध पातळीवर सुरू आहेत.

ज्या थकबाकीदार संस्था वसुलीसाठी सहकार्य करणार नाहीत, त्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही. अशा संस्थांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिला होता.

त्यानुसार काही मोठ्या थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. काही बड्या थकबाकीदारांना ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.

थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सह्याद्री मोटर्स, स्वप्नपूर्ती शुगरवर बॅंकेने ताबा घेतला आहे. बॅंकेने सर्वच कर्जदारांवर गेल्या काही महिन्यांपासून कायदेशीर कारवाया सुरू केल्या आहेत. सह्याद्री मोटर्सचे सुमारे ५५ कोटी व स्वप्नपूर्ती शुगरचे २३ कोटी रुपये कर्ज थकीत आहे. पूर्ण रक्कम न भरल्याने कारवाई सुरू आहे.
शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली जिल्हा बॅंक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT