Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत आतापर्यंत झालेल्या पेरणीत हरभऱ्याची पेरणी सर्वाधिक तर रब्बी ज्वारीची पेरणी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. मक्याची पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन झाली आहे. आत्तापर्यंत तीनही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८८.४९ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे..यंदाच्या रब्बी हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत हरभऱ्याची सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ३३ हजार ५९६ हेक्टर इतके आहे. आतापर्यंत प्रत्यक्षात २ लाख ३१ हजार ७३१ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. ही पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९९.२० टक्के इतकी आहे. .Rabi Sowing: रब्बीत ज्वारी, गहू, हरभरा पिकांवर धाराशिवमध्ये भर.रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ७४ हजार ४६५ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ९६ हजार ८१७ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. ही पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७१.७१ टक्के इतकीच आहे. रब्बी ज्वारीची पेरणी अपेक्षेच्या तुलनेत सातत्याने घटते आहे. त्यामध्ये काढणीतील अडचणी व मजुरांचा अभाव हे प्रमुख कारण मानले जाते. तीनही जिल्ह्यात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४४ हजार ६३९ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ३१ हजार १७१ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली. .ही पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९०.६९ टक्के इतकी आहे. यंदा जास्त पावसामुळे शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीला पसंती दिली आहे. रब्बी मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५३ हजार १७२ हेक्टर असताना प्रत्यक्षात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन सुमारे ६१ हजार ४८५ हेक्टरवर मका पिकाची लागवड झाली. ही पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११५.६३ टक्के आहे..Rabi Sowing: रब्बीत ज्वारी, गहू, हरभरा पिकांवर धाराशिवमध्ये भर.इतर रब्बी तृणधान्याचे सर्व साधारण क्षेत्र ६१५५ असताना प्रत्यक्षात ८४५ हेक्टर क्षेत्रावर तृणधाण्याची पेरणी झाली. इतर रब्बी कडधान्याची सर्वसाधारण क्षेत्र ५ हजार ५५६ हेक्टर असताना प्रत्यक्षात २१ हजार ४२ हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची पेरणी झाली. ही पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३७८ टक्के आहे. करडईचे सर्वसाधारण क्षेत्र २०२२ हेक्टर असताना प्रत्यक्षात ३१८ हेक्टरवरच करडईची पेरणी झाली. .जवसाचे सर्वसाधारण क्षेत्र १८०.५५ हेक्टर असताना प्रत्यक्षात २७.४० हेक्टरवरच जवस पेरणी झाली. रब्बी तिळाचे सर्वसाधारण क्षेत्र ४६० हेक्टर असताना त्याची केवळ तीन हेक्टरवर पेरणी झाली. रब्बी सूर्यफुलाचे सर्वसाधारण क्षेत्र २०९६ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७१ हेक्टरवरच सूर्यफुलाची पेरणी झाली. इतर गळीत धान्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५२२७ हेक्टर असताना प्रत्यक्षात २९३ हेक्टरवरच गळीत धान्याची पेरणी झाली..छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेरणी मागेतीनही जिल्ह्याच्या पेरणीचा तुलनात्मक विचार करता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रब्बीची पेरणी सर्वात कमी म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७१.४० टक्के इतकीच झाली आहे. त्या पाठोपाठ जालना जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९१.८६ टक्के तर बीड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १००.६५ टक्के पेरणी झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.