Beed News: कुंडलिका प्रकल्पामुळे १९८६ ला नागझरी (गायमुख) या गावाचे पुनर्वसन होण्यासाठी आजपर्यंत अनेक बैठका झाल्या. अधिकाऱ्यांनीही जबाबदारीतून हात झटकले. या उदासीनतेमुळे गावाचे पुनर्वसन शासनाच्या लालफितीत अडकले आहे..दरम्यान, याबाबत ता. ९ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकी झाली. जिल्हा पुनर्वसन अधिकारी सूर्यवंशी यांनी केज, धारूर, माजलगावच्या तहसीलदारांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना व अर्जदारांना बैठकीची सूचना अथवा उपस्थित राहण्याचे कळविले नव्हते. त्यामुळे ही बैठकही निष्फळ ठरली. नागझरी (गायमुख) येथील ग्रामस्थ मात्र पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत..Village Rehabilitation: गावाच पुनर्वसन करा, गोळेगावच्या महिलांनी मांडली व्यथा .मागील ३५ ते ४० वर्षांपासून नागझरी (गायमुख) येथील ग्रामस्थांचा पुनर्वसनासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. अनेक वर्षे उलटली तरी त्यांना न्यायाची प्रतीक्षाच आहे. या पुनर्वसनाबाबत केजच्या तहसीलदारांना १३ मुद्दे, धारूर तहसीलदारांना ४ मुद्दे, तर माजलगावच्या तहसीलदारांना २६ मुद्द्यांचे निवेदन दिलेले आहे; परंतु सदर निवेदनांकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून सतत दुर्लक्ष होत आहे..त्यामुळे विभागीय आयुक्तांना ३९ मुद्द्यांचे निवेदन देण्यात आले. यावर विभागीय आयुक्तांनी २१ मे २०२४ व १७ जानेवारी २०२४ ला पुनर्वसित गावाची वस्तुस्थिती/सद्यस्थितीचा अहवाल विनाविलंब सादर करण्याचे जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना कळविले होते; परंतु याकडेही दुर्लक्षच झाले..Ahupe Village Rehabilitation: ‘आहुपे’च्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा.गावचे रहिवासी बाबाराव मुरकुटे यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक ९ डिसेंबरला बोलावण्यात आली होती..मात्र, पुनर्वसन अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे माजलगाव, केज, धारूर या तिन्ही तालुक्यांचे तहसीलदार, माजलगावचे उपविभागीय अधिकारी व अर्जदार बाबाराव मुरकुटे यांना या बैठकीची कोणतीही सूचना अथवा उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले नव्हते..परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्वसन अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करत चांगलेच फैलावर घेतले.लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, पक्ष आणि पुनर्वसन विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.