Solapur News: मंगळवेढा व सांगोला तालुक्यांतील चारा छावणी चालकाच्या थकित ३३ कोटी बिलावरून आ. समाधान आवताडे यांनी सरकारला धारेवर धरले. सनी देओलच्या चित्रपटातील डायलॉग प्रमाणे ‘तारीख पे तारीख पर इन्साफ नही मिलता’ याची आठवण करून दिली.तपासणीचा खेळ थांबवून छावणी चालकाची बिले थकीत तत्काळ अदा करावीत अशी मागणी हिवाळी अधिवेशनात केली..२०१८ -१९ च्या कालावधीत सांगोला तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांची बिले प्रलंबित होती. या प्रलंबित बिलावरून यापूर्वी अनेकदा शेकापचे आ. जयंत पाटील, रासपचे आ. महादेव जानकर यांनी महाविकास आघाडी सरकार असताना तर आ.अभिजित पाटील, आ. बाबासाहेब देशमुख, आ. समाधान आवताडे यांनी देखील अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले. परंतु अद्याप त्यांची बिले अदा झाली नाहीत..Nagpur Winter Session: महापालिकेकडे लक्ष; शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष .पावसाळी अधिवेशनात आ.समाधान आवताडे यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी बिल अदा करण्याची मागणी केली होती. परंतु त्यानंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर एक सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी परत तपासणी करावी अशी सूचना दिल्यामुळे ती बिले प्रलंबित राहिली. शुक्रवारी हिवाळी अधिवेशनात आ. बाबासाहेब देशमुख यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित करून बिले न मिळाल्याने आतापर्यंत दोन छावणी चालकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांची बिले कधी अदा करणार असा प्रश्न उपस्थित केला..Nagpur Winter Session: हिवाळी अधिवेशनात रस्त्यावर झोपणाऱ्या आंदोलकांसाठी दिलासा; उच्च न्यायालयाचे तात्पुरत्या निवाऱ्याचे आदेश.त्याला जोडून आ. समाधान आवताडे यांनी तपासणीच्या नावाखाली फाईल इकडून तिकडे जाऊ लागल्यामुळे बिले मिळाली नाहीत. छावणी चालकांनी व्याजाने पैसे काढून छावण्या चालवल्या आहेत. त्यांचा सध्या धीर सुटत चालला आहे. त्यामुळे तपासणीचा खेळ खेळू नये. सांगोला तालुक्यातील २० कोटी ८६ लाख तर मंगळवेढा तालुक्यातील १२ कोटी ६० लाख तातडीने बिले अदा करावेत अशी मागणी केली..मंत्री आशिष जयस्वाल म्हणाले...आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की खास बाब म्हणून छावणी चालकाच्या बिलाची तरतूद करावी. मंत्री आशिष जयस्वाल यांनी सदर छावणी चालकाची देयके हे आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार देण्यात येणार असून ते अधिकार राज्य कार्यकारणीस आहेत. त्यामुळे उपायुक्त, आयुक्त, जिल्हाधिकारी, यांची एकत्रित बैठक बनवून त्यामध्ये असलेल्या त्रुटी जागेवर सोडवून एक महिन्याच्या आत विलंब होणार नाही याची काळजी घेऊन बिले अदा केली जातील असे उत्तर दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.