Sahyadri Farm Agrowon
ॲग्रो विशेष

Sahyadri Farm : सह्याद्री फार्म्समध्ये ३९० कोटींची नवीन गुंतवणूक

Agricultural Investment : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढाकारातून एकत्रित येत स्थापन झालेल्या सह्याद्री फार्म्स प्रोड्यूसर कंपनीची उपकंपनी असलेल्या सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लि. कंपनीमध्ये रिसपॉन्सिबिलिटी (युरोप) व जीईएफ (अमेरिका) यांनी ३९० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Team Agrowon

Nashik News : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढाकारातून एकत्रित येत स्थापन झालेल्या सह्याद्री फार्म्स प्रोड्यूसर कंपनीची उपकंपनी असलेल्या सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लि. कंपनीमध्ये रिसपॉन्सिबिलिटी (युरोप) व जीईएफ (अमेरिका) यांनी ३९० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या समवेत एफएमओ (FMO), प्रोपॅर्को, इन्कोफिन आणि कोरीस या सध्याच्या गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. या गुंतवणुकीचा उपयोग पेटंटेड द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळांच्या लागवड क्षेत्र विस्तारासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या क्षमतेत वाढ व मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीसाठी करण्यात येईल.

सह्याद्री फार्म्स फळे आणि भाजीपाल्याच्या पुरवठा साखळीमध्ये कार्यरत आहे. प्रामुख्याने दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन करणे, प्राथमिक प्रक्रिया तसेच इतर मूल्यवर्धन करून उत्पादने प्रमुख आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्याचे कार्य येथे केले जाते. जवळपास २५००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून उत्पादने घेतली जातात. या कंपनीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रक्रिया सुविधांमुळे टेस्को, एडेका, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि कोका-कोला यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची उत्पादने पुरवली जातात.

अनेक फळांमधील जुने वाण ही बदलत्या हवामानात तग धरू शकत नाही. तसेच ग्राहकांच्याही आवडी-निवडी बदलल्या आहेत. हे लक्षात घेऊन सह्याद्री फार्म्सने द्राक्ष व लिंबूवर्गीय पिकांच्या नवीन वाणांची आयात केली. याकरिता ग्रापा, ब्लूमफ्रेश, इटूम आणि यूरोसेमिलास यांसारख्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय वाण निर्मिती करणाऱ्या कंपन्यासोबत भागीदारी केली आहे. यामुळे देशाच्या फलोत्पादन क्षेत्राला लाभ होईल व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही उत्पादनांचा हिस्सा वाढविण्यास मदत होणार आहे.

२५ हजारांपेक्षा जास्त उत्पादक शेतकरी सह्याद्रीसोबत जोडलेले आहेत. यामुळेच ४० पेक्षा जास्त देशांमध्ये कंपनीची उत्पादने विक्री होतात. यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये ‘सह्याद्री’ने ३१० कोटींची गुंतवणूक मिळविण्यात यश मिळविले होते. त्या वेळी एफएमओ (FMO), प्रोपॅर्को, इन्कोफिन आणि कोरीस या संस्थांनी गुंतवणूक केली होती. गुंतवणुकीच्या दुसऱ्या फेरीतही हे गुंतवणूकदार आहेत. मार्च २०२४ अखेर १,४८२ कोटींपर्यंत मजल मारत चांगला नफादेखील मिळविला. या नव्या गुंतवणुकीमुळे पुढील पाच वर्षांतील वार्षिक वाढीचा वेग सुमारे ४० टक्के एवढा राहण्याचा अंदाज आहे.

भारतीय शेती क्षेत्रात सह्याद्रीच्या माध्यमातून गुंतवणूक करणारे आमचे नवीन गुंतवणूकदार रिसपॉन्सिबिलिटी व जीईएफ यांचेदेखील आभार मानतो. नजीकच्या काळात शेअर बाजारात (IPO) येण्याच्या दिशेने वाटचाल करत असून भारतात शेअर बाजारात येणारी पहिली शेतकरी-मालकीची कंपनी होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. यातून देशातील शेतकऱ्यांना निश्चितच ऊर्जा मिळेल असा विश्‍वास आहे
विलास शिंदे, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

SCROLL FOR NEXT