Green Energy Investment : हरित ऊर्जेमधील गुंतवणूक २५ लाख कोटींवर जाणार

Pramod Chaudhari (Ethanol Man of India) : जगाच्या हरित ऊर्जा क्षेत्रात २०३० पर्यंत २५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, भारतीय शेतकरी भविष्यात अन्नदात्यासोबतच ऊर्जादाता म्हणून ओळखला जाईल.
Pramod Chaudhari
Pramod Chaudhari Agrowon
Published on
Updated on

Pune News : जगाच्या हरित ऊर्जा क्षेत्रात २०३० पर्यंत २५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, भारतीय शेतकरी भविष्यात अन्नदात्यासोबतच ऊर्जादाता म्हणून ओळखला जाईल, असे सूतोवाच भारताचे ‘इथेनॉल मॅन’ अशी ओळख असलेले प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी केले.

देशाच्या जैवऊर्जा क्षेत्रात पायाभूत स्वरूपाचे काम करणारा प्राज उद्योग समूहाला चार दशके पूर्ण झाल्याबद्दल पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना श्री. चौधरी यांनी ऊर्जा क्षेत्राची भविष्यकालीन वाटचाल स्पष्ट केली. या वेळी प्राजचे अध्यक्ष अतुल मुळे (व्यवसाय विभाग) व घनश्याम देशपांडे (तंत्रज्ञान विभाग) उपस्थित होते.

Pramod Chaudhari
Green Energy Technology : हरित ऊर्जा क्रांतीची दिशा

‘‘जग सध्या हवामान बदल व ऊर्जा संक्रमणातून वाटचाल करते आहे. त्यामुळे हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, टाकाऊ पदार्थांपासून ऊर्जा निर्मिती या क्षेत्रांचा चालना मिळेल. हरित ऊर्जा क्षेत्रात जगभरातील कंपन्यांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढेल. एकट्या तेल व वायू क्षेत्रात येत्या दशकात २१ लाख कोटींची गुंतवणूक होईल,’’ असा अंदाज श्री. चौधरी यांनी वर्तविला.

जैव ऊर्जा क्षेत्रात भारत देदीप्यमान वाटचाल चालू ठेवेल; कारण जगातील ५० निवडक कंपन्यांमध्ये प्राज अग्रस्थानी आहे. ही घोडदौड पुढे चालू ठेवण्यासाठी कर्नाटकात आता १२३ एकरांवर प्राजने ४०० कोटी रुपयांचा नवा प्रकल्प उभारला आहे. त्यातून नजीकच्या काळात अडीच हजार कोटींचा महसूल मिळणे शक्य आहे, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

Pramod Chaudhari
Green Energy : कृषी शिक्षणात हरित ऊर्जा तंत्रज्ञानाचा समावेश होणार ; साखर उद्योगातून स्वागत

जागतिक पातळीवर झालेल्या करारानुसार, हवाई इंधनात (एसएएफ) जैव इंधनाचे मिश्रण झपाट्याने वाढविले जाणार आहे. २०२८ पर्यंत भारताने देखील दोन टक्के मिश्रणाचे लक्ष्य ठेवले. एसएएफ निर्मितीच्या तंत्रज्ञानात प्राजने आघाडी ठेवली आहे. प्राजच्या तंत्रज्ञानातून तयार झालेल्या एसएएफवर यापूर्वी पुणे ते दिल्ली मार्गावर यशस्वीपणे विमान उडविण्यात आले. त्यामुळे हवाई इंधन हे प्राजसाठी नव्या संधीचे दालन ठरेल, असा विश्‍वास श्री.चौधरी यांनी व्यक्त केला.

४०० पेटंट ताब्यात

जैव ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर कामगिरी करणाऱ्या प्राजची स्थापना १९८३ मध्ये झाली. आज या कंपनीची उलाढाल ३४०० कोटींवर पोहोचली आहे. ‘प्राज’मधील संशोधकांनी आतापर्यंत ४०० पेटंट मिळवले असून, १०० देशांमध्ये प्रकल्प उभारणाऱ्या या कंपनीने या दशकाच्या अखेर दहा हजार कोटींपर्यंत उलाढाल नेण्याचे ध्येय ठेवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com