Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Road Damage : खरडलेल्या रस्त्यांना मुहूर्तच सापडेना

Road Repair Work : मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून ग्रामीण भागातील खरडलेले रस्ते व तुटक्या पुलांच्या दुरुस्तीचे तसेच नव्याने बांधकामाबाबतचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहेत.

Team Agrowon

Amaravati News : संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते खरडले असून काही पुलांना सुद्धा नुकसान झाले आहे. मात्र बांधकाम विभागाला शासनाकडून कुठलेही आदेश मिळालेले नसल्याने यंदाही रस्त्यांचे सर्वेक्षण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, मागील चार वर्षांपासून प्रस्ताव सादर करून देखील जिल्हा परिषदेला रस्तेदुरुस्तीसाठी एक छदामही मिळालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांना आता दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीची प्रतीक्षा लागली आहे.

मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून ग्रामीण भागातील खरडलेले रस्ते व तुटक्या पुलांच्या दुरुस्तीचे तसेच नव्याने बांधकामाबाबतचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र शासनाकडून त्याची कुठलीच दखल घेण्यात आलेली नाही. यंदाही संततधार पावसामुळे अनेक तालुक्यांमधील ग्रामीण रस्ते खरडून गेले आहेत, परंतु शासनाकडून सर्वेक्षणाचे कुठलेही आदेश न मिळाल्याने कुठलीही कार्यवाही सुरू झालेली नाही.

मागील वर्षी शासनाकडून न मागताही बांधकाम विभागाने पूरहानीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता, त्यानुसार रस्ते व पूल दुरुस्तीसाठी सात कोटींची मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप एक पैसाही मिळालेला नाही.

जि. प. बांधकाम उपविभाग क्र. एक अमरावती, क्र. दोन अमरावती, चांदूररेल्वे, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर तसेच धारणी या तालुक्यांमधून २०२३-२४ मध्ये ८८ रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आले होते, मात्र पुढे काहीच झाले नाही. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण रस्त्यांच्या डागडुजीसाठी आता जिल्हा नियोजन समितीवरच प्रशासनाची भिस्त राहणार आहे.

२०२३-२४ मधील अतिवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते व पुलांची माहिती

 खराब झालेले रस्ते (किमी) ८५.४२ किमी

 पूलसंख्या १५

 दुरुस्तीसाठी लागणारा निधी ५.६० कोटी

 पुलांच्या दुरुस्तीसाठी १.४० कोटी

 एकूण ७ कोटी

अद्याप पूरस्थिती झालेली नाही. त्यामुळे सर्वेक्षण केले नाही. मागील तीन वर्षांपासून आम्ही शासनाला प्रस्ताव पाठविले आहे, मात्र मागणीनुसार एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे आता जिल्हा नियोजनमधून काही तरतुदीची आशा आहे. तसा पाठपुरावा आम्ही करू.
- दिनेश गायकवाड, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग (जि. प.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: राज्यात ‘लम्पी स्कीन’ पुन्हा डोके वर काढतोय

Jan Suraksha Bill: ‘जनसुरक्षा’ दोन्ही सभागृहांत मंजूर

Animal Husbandry Status: पशुपालनाला आता कृषी समकक्ष दर्जा

Cotton Mission 2030: देश कापूस क्षेत्रात २०३० पर्यंत स्वयंपूर्ण करणार

Soyabean Oil Price: सोयातेलाच्या भावात ३० टक्क्यांनी वाढ

SCROLL FOR NEXT