Farm Road Damage : खानदेशात सततच्या पावसाने शेतरस्त्यांची दैना

Impact of Continuous Rain : खानदेशात शेतरस्त्यांची यंदा सततच्या पावसाने दैना झाली आहे. केळीसह पपई व अन्य शेतीमाल काढणीलाही यामुळे फटका बसला आहे.
Farm Road Issue
Farm Road IssueAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात शेतरस्त्यांची यंदा सततच्या पावसाने दैना झाली आहे. केळीसह पपई व अन्य शेतीमाल काढणीलाही यामुळे फटका बसला आहे. अनेक शेतकरी पावसाळ्यात काढणीवर येणऱ्या पपई, कलिंगड, भाजीपाला पिके व केळीची लागवड टाळत आहेत. यामुळे पाणंद रस्ते योजना अधिकची व्यापक करण्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.

खानदेशात पाणंद रस्ते योजनेतून सुमारे दीड हजार रस्ते झाले आहेत. या रस्त्यांचे मजबुतीकरणही काही भागात नंतर नियोजन समितीच्या निधीतून झाले आहे. काळ्या कसदार जमिनींच्या क्षेत्रात शेतरस्ते अधिकचे खराब झाले आहेत. वाफसा होत नसल्याने या भागात शेतरस्त्यांवरून जाणे सध्या अशक्य आहे.

Farm Road Issue
Heavy Rain Issue : जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये पावसाने हानी

केळी, पपई आदी पिकांच्या क्षेत्रात अधिकच्या अडचणी शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत आहेत. कारण या भागात केळी, पपई आदी पिके काढणीवर आहेत. त्यासाठी मजबूत शेतरस्ते हवे आहेत. परंतु शेतरस्त्यांअभावी केळी, पपई काढणीला फटका बसत आहे.

Farm Road Issue
Agricultural Issues : माॅन्सूनोत्तर पावसानंतर टोमॅटो लागवडी अडचणीत

खानदेशात नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे, जळगावातील रावेर, यावल, अमळनेर, चोपडा, जळगाव, जामनेर, भडगाव-पाचोरा, मुक्ताईनगर, धरणगाव आदी भागांत केळी, पपईसह अन्य पिकांची शेती आहे.

या भागात पाणंद रस्ते करण्यात आले. परंतु त्यांची संख्या कमी आहे. जळगाव, शिरपूर या भागात पाणंद रस्त्यांची संख्या बरी आहे. परंतु अन्यत्र समाधानकारक काम झालेले नाही. यामुळे या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांमध्ये मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com