CM Devendra Fadnavis Agrowon
ॲग्रो विशेष

CM Devendra Fadnavis: मराठीचा उत्सव नव्हे, रुदालीचे भाषण: मुख्यमंत्री

Political Speech: शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे २० वर्षांनंतर राजकीय व्यासपीठावर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे २० वर्षांनंतर राजकीय व्यासपीठावर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

यावरून श्री. फडणवीस यांनी दोन भाऊ एकत्र आल्याचे श्रेय त्यांनी मला दिले ते बरे झाले. पण ‘विजय मेळाव्याऐवजी रुदालीचे ते भाषण होते,’ अशी खोचक टीका केली. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा चेहरामोहरा आम्ही बदलला, यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही,’’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की मराठीबद्दल एक शब्द न बोलता, आमचे सरकार पाडले, आम्हालाच निवडून द्या असे भाषण झाले. हा मराठीचा उत्सव नव्हता, तर रुदालीचे दर्शन होते. त्यांना असूया आहे, की २५ वर्षे महापालिका त्यांच्याकडे आहे.

पण दाखविण्यासारखे काहीच करू शकले नाहीत. आम्ही मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मुंबईचा चेहरा बदलवला. ठाकरेंच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला. आम्ही बीडीडी, पत्राचाळ, अभ्युदय नगरमधील नागरिकांना तेथेच मोठे घर दिले.

मुंबईतील मराठी, अमराठी सगळेच आमच्यासोबत आहेत. आम्ही मराठी आहोत. आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे. पण त्याआधी आम्ही हिंदू आहोत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT: ‘डीबीटी’त चुकीची माहिती दिल्यास पाच वर्षे बंदी

Cotton Picking Wages: खानदेशात कापूस वेचणी मजुरीदर स्थिर

Agricultural Loss: नऊ वर्षांत ६४० लाख हेक्टरवरील पिकांचा घास

Air Pollution: वायू प्रदूषणामुळे देशात १८ टक्के मृत्यू

Farmer Issue: कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही सावरू शकत नाही

SCROLL FOR NEXT