Orange  Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Sunburn : वाढलेल्या तापमानाचा संत्रा पट्ट्याला फटका

Summer Heat : गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने संत्रापट्ट्यात झाडाच्या वरील बाजूस शेंडा मर रोगाचा प्रादुर्भाव होत फांद्या वाळत आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : तापमानातील वाढीमुळे संत्रापट्ट्यात सध्या शेंडेमरचा प्रादुर्भाव झाल्याने झाडांच्या शेंड्याकडील फांद्या वाळण्या सोबतच लहान आकारांच्या फळांची गळती होत असल्याची माहिती घोडदेव (ता. मोर्शी)) येथील शेतकरी रुपेश वाळके यांनी दिली. अमरावती, नागपूरसह विदर्भातील विदर्भात सर्वदूर ही समस्या असल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बागायतदारांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात सुमारे दीड लाख तर विदर्भातील एकट्या अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख हेक्टरवर संत्रा लागवड आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने संत्रापट्ट्यात झाडाच्या वरील बाजूस शेंडा मर रोगाचा प्रादुर्भाव होत फांद्या वाळत आहेत. त्यासोबतच फळांची गळतीदेखील होत आहे. परिणामी, बागायतदारांची चिंता वाढली आहे. घोडदेव येथील रुपेश वाळके यांची सहा एकरांवर संत्रा बाग आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिफारशीत घटकांची फवारणी करून देखील त्यांना बागेतील गळतीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यासोबतच वरील बाजूस फांद्या वाळत असल्याचे त्यांनी सांगितले. आंबिया बहरातील फळांची गळती होत असल्याने हंगामअखेर अपेक्षित उत्पादकता मिळणार नाही. त्यामुळे बागायतदारांना कोट्यवधी रुपयांची नुकसान सोसावे लागणार आहे. त्याचबरोबर भाजीपाल्यासह इतर पिकांनाही फटका बसला आहे.

ड्राय झोनमुळे पाणी उपशावर बंदी

वरुड, मोर्शी परिसरात ७० हजार हेक्टरवर संत्रा लागवड आहे. संत्रा बागा वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यामुळे पाणीपातळी ८०० ते ९०० फुटांपर्यंत खाली गेली. त्यामुळे शासनाने हा भाग ड्राय झोन म्हणून जाहीर करीत नवीन बोअरवेलवर बंदी लादली आहे.

...असे आहे तापमान

एप्रिल २८ ते मे ०६---अमरावती---नागपूर (अंश सेल्सिअसमध्ये)

२८ : ४०--३९.७

२९ : ४०.४-- ४०.१

३० : ४२.८--४१.४

०१ : ४१.८--४०.८

०२ : ४६.८--४०.८

०३ : ४१.४--३९.९

०४ : ४२.६--४०.५

०५ : ४३.८--४१.५

०६ : ४२.६--४३

४५ अंश सेल्सिअस तापमान असेल तर जमिनीचे तापमान पाच ते दहा अंश सेल्सियसने वाढते. यावर गरम वारे व इतर घटक परिणाम करणारे ठरतात. बागेचे तापमान वाढते असल्यास प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया मंदावते व झाडाला अन्नपुरवठा कमी होतो. मार्च महिन्यात ४०, एप्रिल ४२.५, तर मे महिन्यात ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान झाल्यास त्याचा संत्रा पिकावर दूरगामी परिणाम होतो. सध्या आंबिया बहरातील फळांचा आकार लिंबाप्रमाणे असून आकार जसा वाढतो त्यानुसार फळाची सहनशीलता वाढीस लागते. मात्र तापमान वाढल्यास फळ गळती होऊ शकते. याकरिता काही फवारण्याची शिफारस केली आहे. त्यासोबतच बागेचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हिरवळीच्या खताचा देखील वापर केला जाऊ शकतो. बागेतील बाष्पीभवन रोखण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला पाहिजे.

- डॉ. दिनेश पैठणकर,

कनिष्ठ उद्यान विद्यावेता, अखिल भारतीय समन्वय प्रकल्प (फळे) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT