Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Banana Farming : उन्हाची तीव्रता वाढल्याने याचा परिणाम केळी पिकावर होत आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांपुढे एक नवे संकट निर्माण झाले असून, नवीन लागवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांची केळीची रोपे‌ उन्हामुळे जळू लागली आहेत.
Banana Crop
Banana Crop Agrowon

Solapur News : उन्हाची तीव्रता वाढल्याने याचा परिणाम केळी पिकावर होत आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांपुढे एक नवे संकट निर्माण झाले असून, नवीन लागवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांची केळीची रोपे‌ उन्हामुळे जळू लागली आहेत. काही शेतकऱ्यांकडून क्रॉप कव्हर व तागाची लागवड करून रोपे वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Banana Crop
Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

सोलापूर जिल्ह्यात केळीच्या पिकाखालील क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यामधील अनुकूल वातावरण आणि या पिकाला मिळणारा चांगला बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांची केळी पिकाकडे मोठी पसंती वाढली आहे. जिल्ह्यात वर्षभर केळी पिकाची लागवड केली जाते. एप्रिल, मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता जास्त असली तरी यावेळी लागवड केलेल्या केळीला दर चांगला मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा या महिन्यात केळी लागवड करण्यावर भर असतो.

परंतु सध्या जिल्ह्यातील तापमान ४२ ते ४३ अंशांपर्यंत जात असल्याने या उन्हाच्या तीव्रतेने नवीन लागवड केलेली केळीची रोपे जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

Banana Crop
Banana Market : खानदेशात केळी दरावर दबाव

जळालेल्या रोपाच्या ठिकाणी दुसरे नवीन रोप लावण्याची वेळ येत आहे. नंतर लावलेल्या रोपांमुळे केळीचा प्लॉट एकाच वेळी काढणीस येत नाही. दोन्हीचा दर्जा सारखा राहात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी लागवड केलेल्या केळीच्या रोपांच्या बाजूने व्ही आकारामध्ये लाकडी कामटीचा वापर करत पांढऱ्या पातळ कापडाचा संरक्षण कवच म्हणून वापर करत आहेत. यामुळे या रोपांना उन्हाची तीव्रता कमी होत असून, रोपे जळण्याचे प्रमाण कमी होत आहे. याबरोबरच काही शेतकरी केळीबरोबरच रोपांभोवती अल्प प्रमाणात तागलागवड करतात, या दोन्ही प्रयोगांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम केळीच्या रोपांवर होऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी लागवड करताना केळी रोपाच्या दक्षिण- पूर्व बाजूस एल आकारात तागाची लागवड करावी. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होते. प्लॉटमध्ये वातावरण थंड राहण्यास मदत होते. काही कारणांमुळे ते शक्य न झाल्यास ऐनवेळी उन्हाळ्यात उन्हाच्या गरम झळांपासून वाचण्यासाठी प्रोटेक्शन पेपरचाही उपयोग होतो.
किरण पाटील, केळी तज्ज्ञ, जैन इरिगेशन सिस्टीम, जळगाव, सोलापूर विभाग
यावर्षी मी माझ्या दोन एकर क्षेत्रावर केळी रोपांची लागवड केली होती. उन्हाच्या तीव्रतेमुळे २४०० रोपांपैकी ११०० पेक्षा जास्त रोपे उन्हाच्या तीव्रतेमुळे जळाली आहेत. त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. जळालेल्या रोपांच्या ठिकाणी मी पुन्हा नवीन रोपे लावण्याचे काम सुरू केले आहे.
राहुल गोळे, शेतकरी, चिखलठाण, ता. करमाळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com