Kaju Tree Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Farming: काजू उत्पादकांवर दुहेरी संकट! करपलेला मोहर आणि कीड प्रादुर्भावाने नुकसान

Heatwave Impact on Crops: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे दुसऱ्या टप्प्यात आलेला काजू मोहर पूर्णतः करपल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूला दुसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहर पूर्णतः करपला आहे.वाढलेल्या तापमानाचा हा परिणाम मानला जात आहे. मोठ्या प्रमाणात मोहर करपल्याने उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे.

लांबलेल्या पावसामुळे यावर्षी काजू हंगाम विलंबाने सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यातील मोहर डिसेंबरमध्ये आला. या मोहराला झालेल्या फळधारणेचे उत्पादन सुरू आहे. परंतु दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात काजू कलमांना मोहर आला होता. मोहराने झाडे बहरून गेली होती.त्यामुळे काजू उत्पादकांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हांचा चटका बसू लागला.

४ फेब्रुवारीपासून तापमानवाढ सुरू झाली.साधारणपणे ३७ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले. सतत वाढलेल्या तापमानामुळे दुसऱ्या टप्प्यातील मोहर पूर्णतः करपला आहे.हा मोहर काळवंडला असून दुसऱ्या टप्प्यातील उत्पादन आशा शेतकऱ्यांनी सोडली आहे. दुसऱ्या टप्प्यातून ५ टक्के देखील उत्पादन शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता नाही. हा संपूर्ण मोहरच करपल्याने काजू उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान अजूनही सततचे तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे उरलासुरला मोहर देखील करपण्याची शक्यता आहे. या तापमानाचा नव्याने येत असलेल्या मोहरावर देखील परिणाम होणार आहे.

किडीच्या प्रादुर्भावाने हैराण

काजू उत्पादक यावर्षी नैसर्गिक चक्रव्यूहात अडकले आहेत. एकीकडे तापमानवाढीचा मोठा तडाखा काजू बागांना बसला आहे. तर बी आणि बोंडु खाणाऱ्या किडीचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department: दांगट समितीकडून गैरव्यवहारांची चौकशी नको

China Fertilizer Ban: चीनकडून खत निर्यात थांबल्याने उद्योगांवर परिणाम निश्चित

Aashadhi Wari 2025: संतांचे पालखी सोहळे पंढरीच्या वेशीवर

Gujrat Onion Farmers: गुजरातच्या कांदा उत्पादकांना क्विंटलमागे २०० रुपयांची मदत

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ रद्द करण्याची सरकारला सद्‌बुद्धी दे

SCROLL FOR NEXT