Cashew Sunburn : हवामान बदलाचा परिणाम: काजू मोहर करपला, आंबा उत्पादक संकटात

Mano Fruit Fall : काजूचा मोहर करपला असून आंबा पिकांमध्ये फळगळ वाढली आहे. याचा परिणाम आंबा, काजू उत्पादनावर होणार आहे.
Mango Blossonm
Mango Blossom
Published on
Updated on

Sindhudurg News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानवाढीचा आंबा, काजू पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. काजूचा मोहर करपला असून आंबा पिकांमध्ये फळगळ वाढली आहे. याचा परिणाम आंबा, काजू उत्पादनावर होणार आहे.

जिल्ह्यात गेली चार-पाच वर्षे फेब्रुवारीच्या मध्यावर तापमान वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०२२ मध्ये १५ फेब्रुवारीनंतर तापमानवाढ झाल्याच्या नोंदी आहेत. परंतु यावर्षी ४ फेब्रुवारीपासून तापमान वाढ होण्यास सुरुवात झाली.

Mango Blossonm
Cashew Pest Infestation: किडीच्या प्रादुर्भावाने काजू बागायतदार हैराण

या दिवशी ३७ अंश सेल्सिअस इतके तापमान राहिले. त्यानंतर ४ ते २५ फेब्रुवारीपर्यंत सातत्याने तापमानवाढ राहिली आहे. या कालावधीत काही दिवसांचा अपवाद वगळला तर तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले. २४ फेब्रुवारीला ३८ अंश सेल्सिअसची नोंद मुळदे संशोधन केंद्रावर झाली.

Mango Blossonm
Heatwave Effect on Mango: कोकणात उन्हाचा कहर! वाढत्या उन्हाने हापूस भाजतोय

तापमानामुळे काही भागातील मोहर करपून गेला आहे. तर भागात फळगळ झाली. काही भागात फळधारणाच झाली नाही. या वर्षी ५० टक्के काजूला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मोहर आला.

तापमानामुळे अधिकतर मोहर काळवंडला. फुलकिडी, बी आणि बोंड खाणाऱ्या किडींसह बुरशींचा प्रादुर्भाव वाढला. नद्यांच्या पाणीपातळीतदेखील घट झाली. नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर देखील परिणाम जाणवत आहे.

तापमानवाढीचा आंबा पिकांवर सुरुवातीला परिणाम जाणवला. काही ठिकाणी फळगळ तर काही ठिकाणी आंबा करपला होता. मात्र आठ दिवसांत हे प्रमाण कमी झाले आहे. शेतकरी देखील झाडांना पाणी देणे, पाण्याची फवारणी करणे, असे उपाय करू लागले आहेत.
- डॉ. अजय मुंज, शास्त्रज्ञ, आंबा फळ संशोधन उपकेंद्र, रामेश्वर देवगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com