Paddy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : आहुपे खोऱ्यात भात झोडणीची लगबग

Paddy Farming : आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील आदिवासी डोंगराळ भागातील गावांमध्ये भात काढणी व झोडणीच्या कामांनी वेग घेतला आहे.

Team Agrowon

Ambegaon News : आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील आदिवासी डोंगराळ भागातील गावांमध्ये भात काढणी व झोडणीच्या कामांनी वेग घेतला आहे. तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील आहुपे खोरे, भीमाशंकर खोरे तसेच गोहेच्या खोऱ्यातील गावांमध्ये शेतकरी तांदूळ पीक मोठ्या प्रमाणावर घेतात.

पूर्वी या भागात आंबेमोहोर, रायभोग, खडक्या, जीर या वाणाचे तांदूळ पीक घेतले जात होते. आता जास्त उत्पादन देणाऱ्या सुवासिक इंद्रायणी वाणाचे तांदळाचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

दोन आठवड्यापासून भात काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या भात काढणी करून लगेच झोडणी करण्यावर शेतकरी भर देत आहे.

भात काढणीला आला असताना या परिसरात झालेल्या परतीच्या पावसाचा भात पिकाला फटका बसला शेतातील भात पिके आडवी झाली त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे. असे डोण (ता. आंबेगाव) येथील शेतकरी नटवरलाल कृष्णा गवारी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

District Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत ११६ वैध, तर ४४ अर्ज अवैध

Bhama Askhed Dam: भामा-आसखेडचे आवर्तन लांबणीवर

Farmers Demand: पीक विम्यातील ‘ट्रिगर’ काढून पाठीत खंजीर खुपसला

Seed Germination Testing: दर्जेदार रोपांसाठी बियाण्यांची उगवणक्षमता, जोम महत्त्वाचा

Brown Biorefinery: शेतावरील ‘ब्राउन बायोरिफायनरी’

SCROLL FOR NEXT