Padalase Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Project : पाडळसे निम्न तापी प्रकल्पास सुधारित मान्यता

Agriculture Irrigation : तापी नदीवरील अमळनेर (जि. जळगाव) नजीकच्या निम्न तापी पाडळसे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : तापी नदीवरील अमळनेर (जि. जळगाव) नजीकच्या निम्न तापी पाडळसे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे. यामुळे अनेक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पास गती मिळेल, असे चित्र आहे.

१४ वर्षे हा प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत होता. त्याचा खर्च सतत वाढला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, धरणगाव व धुळ्यातील शिरपूर व शिंदखेडा तालुक्यास या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. शेतीसह उद्योगासंबंधी या भागास या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे. २८ वर्षे हा प्रकल्प रेंगाळलेला आहे.

या काळात आता चौथ्यांदा या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. चार हजार ८९० कोटी ७७ लाख रुपये निधी खर्चास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, लवकरच प्रकल्पाचे रखडलेले काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. राज्य शासनाने या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिल्याने प्रधानमंत्री सिंचन योजनेत या प्रकल्पाच्या समावेशाचा मार्गही मोकळा झाला आहे.

१९९५-९६ मध्ये प्रथमच या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती. त्या वेळेस सुमारे १४२ कोटी रुपये निधीची घोषणा झाली होती. परंतु निधी न मिळाल्याने पुन्हा त्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. पुन्हा निधीची अडचण आली. यामुळे प्रकल्पाची किंमत सतत वाढली. ती आता सुमारे पाच हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे.

एक लाख हेक्टर क्षेत्र भिजणार

पाडळसे निम्न तापी प्रकल्पामुळे जळगाव व धुळे जिल्ह्यांतील सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. केळी, भाजीपाला, फळे व कापूस पिकाच्या शेतीला मोठा आधार या प्रकल्पामुळे होऊ शकतो, असा दावा प्रशासन, शासन करीत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT