Irrigation Project : बलून बंधारे, पाडळसे प्रकल्प अडकला लालफितीत

Padalase Irrigation Project : तापी नदीवर अमळनेर तालुक्यात पाडळसे गावानजीक निम्न तापी प्रकल्प अपूर्ण आहे. त्यासाठीदेखील सुमारे १५०० कोटी रुपयांवर निधी हवा आहे.
Devna Irrigation Project
Devna Irrigation ProjectAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात गिरणा नदीवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला बलून बंधारे व तापी नदीवरील अमळनेरातील निम्न तापी पाडळसे प्रकल्प प्रशासकीय दिरंगाईत अडकला आहे. कुठलीही कार्यवाही होत नसल्याने पुढील मान्यता रखडली आहे. गिरणा नदीवर मागील ३० वर्षे बलून बंधारे प्रकल्पासंबंधी आश्वासन दिले जात आहे. त्यासंबंधी मध्यंतरी विविध मान्यता मिळाल्या.

मध्यंतरी पर्यावरण समितीची मान्यता राज्याकडून मिळत नव्हती. परंतु सत्तांतर झाल्यानंतर मागील वर्षी ही मान्यता मिळाली. बलून बंधारे प्रकल्पासाठी सुमारे १२०० कोटी रुपये निधी हवा आहे. सात बंधारे गिरणा नदीवर चाळीसगाव ते जळगाव यादरम्यान बांधले जातील. यासाठी केंद्र सरकार निधी देणार आहे. परंतु हा निधीच मिळत नाही व कामही सुरू होत नाही, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Devna Irrigation Project
Irrigation Marathwada : मराठवाड्याला कोरड्या जलसिंचनाऐवजी बालाघाटच्या जलविकास योजनेची तीव्र गरज

तापी नदीवर अमळनेर तालुक्यात पाडळसे गावानजीक निम्न तापी प्रकल्प अपूर्ण आहे. त्यासाठीदेखील सुमारे १५०० कोटी रुपयांवर निधी हवा आहे. याबाबत शेतकरी, संघर्ष समित्यांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला. मागण्या, निवेदने दिली. परंतु काम रखडलेच आहे.

हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी म्हटले होते. त्यासाठीदेखील प्रशासकीय स्तरावरून कार्यवाही अपेक्षित होती. परंतु बलून बंधारे व पाडळसे प्रकल्पासंबंधीचे पुढील प्रस्ताव व इतर अहवाल, माहिती सादर करण्यासंबंधी कार्यवाही झालेली नाही.

Devna Irrigation Project
Tembhu Irrigation Scheme : सावळजसह आठ गावांचा ‘टेंभू’त समावेशासाठी उपोषण

याबाबत खासदार उन्मेष पाटील यांनी नुकतीच आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकल्पांना विविध मान्यता राज्य शासनाने दिल्या आहेत. त्याचे पुढील प्रस्ताव व इतर कार्यवाही प्रशासकीय स्तरावरून करणे अपेक्षित आहे. परंतु ही कार्यवाहीच झालेली नाही. ही कार्यवाही करण्यासंबंधी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

बलून बंधाऱ्यांचा मोठा लाभ

गिरणा नदीवर जिल्ह्यासाठी फक्त गिरणा धरण हा मोठा प्रकल्प लाभदायी आहे. तोदेखील भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात आहे. यामुळे बलून बंधाऱ्यांची मागणी अनेक वर्षे आहे. त्याचा बांधकाम खर्च दरवर्षी वाढत आहे. वेळीच हे काम केल्यास खर्च कमी होईल व शेतीसाठी किंवा सुमारे चार हजार हेक्टरला लाभ होईल. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव व जळगाव या तालुक्यांना मोठा फायदा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com