ICAR KVK Review  Agrowon
ॲग्रो विशेष

ICAR : कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांकडून केव्हीकेचा आढावा

KVK Review : कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्य करीत असते. या केव्हीकेचे कार्य या दिशेने सुरू आहे, असे डॉ. रामकृष्ण म्हणाले.

Team Agrowon

Akola News : नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेद्वारे नेमलेल्या तसेच नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्रात कार्यरत असलेले शास्त्रज्ञ डॉ. रामकृष्ण व डॉ. शैलेश गावंडे यांनी अकोला कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन मागील तीन वर्षात राबवलेल्या तांत्रिक उपक्रमांचा आढावा व समस्या जाणून घेतल्या.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. रामकृष्ण आणि डॉ. शैलेश गावंडे यांनी भेट देत केव्हीकेच्या समस्या तसेच सुधारणाबाबत माहितीही जाणून घेतली. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे यांनी मागील तीन वर्षात कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

कृषी विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञांनी विभागनिहाय उपक्रम व मागील तीन वर्षांत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांविषयीची माहिती सादर केली. शास्त्रज्ञांनी भेटीसंदर्भात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची भूमिका स्पष्ट केली.

प्रक्षेत्र भेटीदरम्यान डॉ. रामकृष्ण आणि डॉ. गावंडे यांनी कृषी विज्ञान केंद्रामधील फळरोपवाटिका, मातृवृक्ष बाग, शेळी युनिट, सीड हब प्रकल्प, अतिघन कापूस लागवड प्रक्षेत्र, सीताफळ मातृवृक्ष बाग, हळद लागवड प्रात्यक्षिक, लिंबू मातृवृक्ष बाग, नैसर्गिक शेती प्रकल्प, तुती बाग, बांबू लागवड प्रक्षेत्र, जैविक औषधी निर्मिती प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा, पाने व ऊती तपासणी प्रयोगशाळा, डाळमिल, लाकडी तेल घाणा निर्मिती युनिट आदी प्रकल्पास भेट देऊन माहिती घेतली.

कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्य करीत असते. या केव्हीकेचे कार्य या दिशेने सुरू आहे, असे डॉ. रामकृष्ण म्हणाले. संस्थेचे सचिव प्रवीण सावरकर यांनी डॉ. रामकृष्ण व डॉ. शैलेश गावंडे यांचे स्वागत केले. श्री. सावरकर केव्हीकेच्या प्रगतीचा आलेख मांडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Oil Price: सोयातेलाच्या भावात ३० टक्क्यांनी वाढ

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरी शक्य

Agrowon Podcast: गहू-करडईची आवक घटली, आल्याचे दर स्थिर; पपई-फ्लॉवर दर टिकून व तेजीत

Leopard Terror : खानदेशात पर्वतीय भागात बिबट्यांची दहशत

Banana Research Center : सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र सुरू करावे

SCROLL FOR NEXT