ICAR : कृषी विस्तारासाठी ‘आयसीआयआर’ घेणार खासगी क्षेत्राची मदत

Agriculture Extension : देशाच्या कृषिविस्तार व संशोधनात आता निविष्ठा उद्योगातील खासगी कंपन्यांची मदत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) घेतला आहे.
ICAR
ICARAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशाच्या कृषिविस्तार व संशोधनात आता निविष्ठा उद्योगातील खासगी कंपन्यांची मदत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) घेतला आहे. या उपक्रमातील पहिला भागीदारी करार ‘धानुका अॅग्रिटेक’ कंपनीशी करण्यात आला आहे.

भागीदारी कराराची प्रक्रिया अलीकडेच पूर्ण केल्यानंतर ‘आयसीएआयआर’ने स्वतःची संशोधन व विकास प्रणाली तसेच संशोधन केंद्रांची यंत्रणा मर्यादित प्रमाणात ‘धानुका’ला उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. दीड हजार उच्चशिक्षित मनुष्यबळ बाळगणारी ‘धानुका’ ही देशाच्या निविष्ठा उद्योगातील नामांकित कंपनी समजली जाते.

ICAR
ICAR: भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या महासंचालकपदी डॉ. पाठक

तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, प्रशिक्षण, प्रत्यक्ष भेटी अशा उपक्रमांमध्ये या दोन्ही संस्था आता संयुक्तपणे काम करतील. दोन्ही संस्थांच्या तंत्रज्ञान आदानप्रदानाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या विकासासाठी संयुक्त व्यासपीठ तयार करण्याचा असेल. त्यासाठी देशातील कृषी विज्ञान केंद्रांची (केव्हीके) साखळी उपयोगात आणली जाईल.

या करारांतर्गत सुरू होणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी सोमवारी (ता. २९) पुणे कृषी महाविद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्थांचे (अटारी) संचालक डॉ. एस. के. रॉय, ‘आयसीएआर’चे अतिरिक्त संचालक डॉ. आर. आर. बर्मन, राज्यातील केंद्रीय संशोधन संस्थांचे संचालक तसेच ‘धानुका’चे अध्यक्ष डॉ. आर. जी. अगरवाल उपस्थित होते.

ICAR
ICAR Conference : कृषी क्षेत्रात तरुणांसाठी संशोधनांच्या संधी

‘धानुका’ने यापूर्वी सहा जपानी कंपन्यांशी भागीदारी करार केले आहेत. कार्यशाळेत ‘धानुका’च्या तंत्रज्ञानावर आधारित अकोला विद्यापीठात घेतलेल्या संशोधन चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. या चाचण्यांमधून भुईमूग उत्पादनात ८१ टक्के, तर सोयाबीन उत्पादनात १७ टक्के वाढ झाल्याचे आढळले आहे, असे या वेळी शास्त्रज्ञांना सांगण्यात आले.

कराराची उद्दिष्ट्ये

- शेतकरी, केव्हीके व संलग्न यंत्रणांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे

- शेतकऱ्यांचे उत्पादन, उत्पादकता, उत्पन्न वाढविणे

- साधनसामग्री, तज्ज्ञ मनुष्यबळ, संकल्पना यांचे एकत्रीकरण व उपयुक्तता वाढविणे

- कृषिविस्तार सेवांची व्याप्ती व प्रभाव वाढविणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com