KVK Review : ‘केव्हीके’चा ‘आयसीएआर’कडून आढावा

ICAR : संपूर्ण देशातील ७३१ कृषी विज्ञान केंद्रांच्या (केव्हीके) कामांचा आढावा भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांमार्फत घेतला जात आहे.
KVK Review
KVK Review Agrowon
Published on
Updated on

Jalna News : संपूर्ण देशातील ७३१ कृषी विज्ञान केंद्रांच्या (केव्हीके) कामांचा आढावा भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांमार्फत घेतला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. रामटेके आणि शास्त्रज्ञ डॉ. पी. एच. निकुंभे यांनी खरपुडी केव्हीकेला नुकतीच भेट देऊन कामाचा आढावा घेतला.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या निर्देशानुसार भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठे यांचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचते व हे तंत्रज्ञान पोहोचविण्यामध्ये केव्हीके कशा प्रकारे भूमिका बजावत आहेत, या संदर्भात आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

KVK Review
KVK Badnapur : कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचे मंदिर

या भेटीत त्यांनी केव्हीकेमार्फत मागील तीन वर्षांत घेण्यात आलेले कार्यक्रम प्रशिक्षणे, प्रथमदर्शी पीक प्रात्यक्षिके, शेतावरील चाचण्यांचे आयोजन यासंदर्भात माहिती जाणून घेतली. केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी सर्व सहकारी शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत त्यांच्यासमोर पॉवर पॉइंटच्या माध्यमातून सादरीकरण केले.

केव्हीकेची शेतकऱ्यांपर्यंत योग्य वेळी माहिती पोहोचविण्याची पद्धत, जिल्ह्यातील कृषी विभाग, आत्मा व तत्सम समांतर खात्यांशी असलेला समन्वय, त्यांना देण्यात येणारे तांत्रिक पाठबळ, शेतकऱ्यांद्वारे तंत्रज्ञान अवलंबनाचे प्रमाण, त्यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वाढलेले उत्पादन, शेतकऱ्यांच्या जीवनात झालेले दीर्घकालीन बदल, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्याची पद्धत, कार्यक्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला स्वयं सहायता समूह, पीक उत्पादन गट, यांना होणारी मदत केव्हीकेतील उपलब्ध सुविधा, निविष्ठांची उपलब्धता, केव्हीकेच्या अडीअडचणी, केव्हीकेच्या माध्यमातून सुरू झालेले उद्योग व्यवसाय आदींबाबत माहिती जाणून घेतली.

KVK Review
KVK Golden Jubilee Festival : ‘केव्हीके’चा सुवर्ण जयंती महोत्सव उत्साहात

जालना जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे केव्हीकेने द्राक्ष संशोधन केंद्राच्या मदतीने द्राक्ष पिकातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शास्त्रज्ञांनी केव्हीकेच्या प्रक्षेत्रास भेट देऊन प्रक्षेत्रावरील सर्व प्रात्यक्षिके व उपक्रमांची माहिती जाणून घेतली. केव्हीकेद्वारे आयोजित तीन दिवसीय शेती यांत्रिकीकरण या विषयावरील प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला व काही निवडक शेतकऱ्यांशी चर्चाही केली.

केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांच्यासह विषय विशेषज्ञ अजय मिटकरी, राहुल चौधरी, डॉ. संगीता कऱ्हाळे, डॉ. हनुमंत आगे, शशिकांत पाटील, सुनील कळम, पंडित वासरे, फहादखान पठाण, सलमान पठाण, सुधीर सूर्यवंशी, पंजाब थिटे यांच्यासह सर्व शास्त्रज्ञ अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com