Paddy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : वाणामधील बदलाने वातावरण बदलाला उत्तर

Paddy Cultivation : दापोली (जि. रत्नागिरी) येथील अनिल शिवगण यांनी वडिलोपार्जित पारंपरिक भात शेतीमध्ये खऱ्या अर्थाने २०१० मध्ये लक्ष घातले.

राजेश कळंबटे

Paddy Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : भात

शेतकरी : अनिल हरिश्‍चंद्र शिवगण

गाव : दापोली, जि. रत्नागिरी

भात शेती : दीड एकर (स्वतःची), एक एकर भाडेतत्त्वावर.

दापोली (जि. रत्नागिरी) येथील अनिल हरिश्‍चंद्र शिवगण यांनी पारंपरिक भातशेतीमध्ये बदल करताना संकरित व सुधारित वाणांचा वापर, लागवडीसाठी चारसूत्री पद्धतीचा अवलंब, एसआरटी पद्धत, छोट्या यंत्राचा वापर सुरू केला. त्यामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली असून, पीक स्पर्धेमध्ये जिल्ह्यात पहिला - दुसरा क्रमांक मिळवत आहेत.

दापोली (जि. रत्नागिरी) येथील अनिल शिवगण यांनी वडिलोपार्जित पारंपरिक भात शेतीमध्ये खऱ्या अर्थाने २०१० मध्ये लक्ष घातले. त्यांना भाततशेतीतील खर्च आणि उत्पन्न यांचा ताळेबंद जमत नसल्याने ती आतबट्ट्याची होत असल्याचे दिसून आले. त्यात काय आणि कोणते बदल करता येतील, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले.

भातशेतीमध्ये संकरित व सुधारित जाती वापरणे, लागवडीसाठी चारसूत्री पद्धतीचा अवलंब, एसआरटी पद्धत, विविध कामासाठी पॉवर टिलरसह छोट्या यंत्राचा वापर सुरू केला. त्यातून भाताचे उत्पादन वाढलेच. यंत्र भाडेपट्टीने देण्याचा व्यवसायही सुरू झाला.

भात शेतीत हे केले बदल

दीड एकर स्वतःची आणि भाडे तत्त्वावरील एक एकर अशी अडीच एकर क्षेत्रावर भात पीक करतात. उत्पन्न वाढीसाठी २०१० मध्ये भात शेती तंत्रात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कृषी विभागाने सुचवलेल्या चारसूत्री भात लागवडीचा अवलंब केला. सुरुवातीला दोरीवर लागवड करण्यामध्ये काही अडचणी आल्या. पण त्यामुळे भात बियाणे कमी लागले. खतांच्या खर्चात बचत झाली. पिकातील गवत काढणे सुलभ झाले.

हे फायदे दिसत असल्यामुळे २०१६-१७ पासून नियमितपणे चारसूत्री तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. एक गुंठ्याला ९० किलो भात मिळाल्याने कृषी विभागाच्या पीक स्पर्धेत जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळाला. एकरी ३ हजार किलो उत्पादन आणि भात विक्रीतून २५ हजार रुपये मिळाले.

खर्चात आणखी बचत करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून चंद्रशेखर भडसावळे यांच्या ‘एसआरटी’ पद्धतीचा वापर सुरू केला. त्यात भजावळ करावी लागत नसल्यामुळे तो कालावधी वाचला. नांगरणी करून वाफे तयार केले.

त्यावर पेरणी केल्याने पुनर्लागवडीचा वेळ वाचला. पहिल्या वर्षी गुंठ्याला ८४ किलो उत्पादन मिळाले. त्या वर्षी जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळाला. एकरी २५०० किलो भात उत्पादन मिळाले. पूर्वी त्यांना कसेबसे ६०० ते ७०० किलो भात मिळे.

वाणामधील बदल ठरला फायदेशीर

पारंपरिक बियाण्याऐवजी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘रत्नागिरी ८’ हे वाण गतवर्षीपासून वापरत आहे. कोकणातील हवामानाला पूरक, रोगासाठी प्रतिकारक आणि अधिक उत्पादनक्षम असे हे वाण चवीलाही चांगले आहे. गेल्या वर्षी रत्नागिरीत पाऊस अनियमित होता. पेरणीनंतर पाऊस नसल्याने रोगाच्या प्रादुर्भावाची भीती होती. मात्र ‘रत्नागिरी ८’ बियाणे चांगल्या प्रकारे तग धरून राहिले. दिवाळीपूर्वी कापणीला तयार झाले.

त्यामुळे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात परतीचा जोरदार पावसात सापडणारे काढणीचे पीक मागील वर्षी त्यापूर्वी कापले गेले. त्यामुळे उत्पादन व त्याचा दर्जा दोन्ही वाढले. पीक कालावधीतील पाण्याच्या ताणामुळे भातावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव अधिक राहिल्याने उत्पादन एकरी ७०० किलो मिळाले. या वर्षी या वाणाबरोबरच एक संकरित आणि एक सुधारित वाणही एक काडी पद्धतीने लावण्याचे नियोजन असल्याचे अनिल यांनी सांगितले.

यांत्रिकीकरणाचे लाभ

अनिल यांनी भातशेतीसाठी पॉवर टिलर घेतला. बैलजोडीने एक एकर क्षेत्राची मशागत व चिखलणीसाठी दोन दिवस लागतात. तुलनेत पॉवर टिलरने साडेतीन तासात काम होते. स्वतःची कामे झाल्यानंतर अन्य शेतकऱ्यांना ४०० रुपये प्रति तास या प्रमाणे भाडेतत्वावर दिला जातो. हंगामामध्ये या कामातूनच एक लाख रुपये उत्पन्न हाती येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पॉवर टिलरप्रमाणे भात कापणीसाठी, मळणीसाठी यंत्र वापरले. भात कापणी यंत्रामुळे ८ ते १० माणसांचे काम एकटा मजूर करतो. सुमारे २ हजार रुपयांची बचत होते. मळणी यंत्रामुळे केवळ दोन व्यक्ती मळणी करतात. पाच ते सहा मजुरांची मजुरी वाचते. यंदा पूर्वमोसमी पाऊस होऊन गेल्यामुळे पेरणीची तयारी सुरू केली आहे.

अनिल हरिश्‍चंद्र शिवगण, ७७९८६३८३४३, (शब्दांकन : राजेश कळंबटे )

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT