Zero Tillage Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Zero Tillage Technique : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात वाहते शून्य मशागत तंत्राचे वारे

Agriculture Technology : सेंद्रिय कर्बवाढीसोबतच इतरही अनेक फायदे शून्य मशागत तंत्रज्ञानाचे समोर आले आहेत.

Team Agrowon

Yavatmal News : सेंद्रिय कर्बवाढीसोबतच इतरही अनेक फायदे शून्य मशागत तंत्रज्ञानाचे समोर आले आहेत. त्यामुळेच या तंत्रज्ञानाला शेतकऱ्यांचा देखील वाढता प्रतिसाद असून ३०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रांवर शेतकऱ्यांनी याचा उत्स्फूर्तपणे अवलंब केला आहे.

पोत खालावत असल्याने संवर्धित शेती हा विषय जागतिकस्तरावर गांभीर्याने घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील या अंतर्गत शून्य मशागत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जात आहे.

आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात देखील शेतकरी हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यानुसार आतापर्यंत ३०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर या तंत्रज्ञानानुसार पिकाचे व्यवस्थापन केले जात आहे.

काय आहे तंत्रज्ञान?

यामध्ये एकदा बेड तयार केल्यानंतर त्याच बेडवर वारंवार लागवड करता येते. त्यामुळे मशागतीवरील खर्चात बचत होते. या पद्धतीत सेंद्रिय कर्ब वाढ नोंदविली गेली आहे. सेंद्रिय कर्ब ०.४ वरून ०.८ ते १ टक्‍का असा वाढल्याचे निरीक्षण आहे.

या पद्धतीत १५ ते १८ क्‍विंटल एकरी कापसाची, तर १५ ते १६ क्‍विंटल सोयाबीनची उत्पादकता मिळविणारे शेतकरी देखील आहेत. तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करण्यास सांगितले जाते. त्यामुळे पिकासोबत तणाची मुळे देखील जमिनीत राहतात व पिकाचे अवशेष बेडमध्ये राहिल्याने कर्बात वाढ होते, असेही या शेतीपद्धतीचा अवलंब करणारे तज्ञ सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sudhir Mungantiwar: ज्यांचं अन्न खाता, त्यांच्याशी तरी खोटे बोलू नका; ‘कृषी समृद्धी’वरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

Shirur Jambut APMC: जांबूत येथील उपबाजार १५ वर्षांपासून बंद अवस्थेत

Pune Monsoon Rain: पुणे जिल्ह्यात विविध भागांत मॉन्सूनचे दमदार पुनरागमन

Seed Scam: शेतकऱ्यांचे आयुक्तालयाच्या छतावर आंदोलन; धाराशिव निविष्ठा घोटाळा प्रकरण

Heavy Rainfall Relief: मागील वर्षीच्या अतिवृष्टीचे १६ हजार कोटी खात्यात जमा; मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची माहिती

SCROLL FOR NEXT