Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्रज्ञानाने होणार दहा हजार एकरांवर शेती

POCRA Project : यंदा प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात याअंतर्गत सुमारे दहा हजार एकरांवर शून्य मशागत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यात आले आहे.
Zero Cultivation
Zero CultivationAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : मातीचा पोत खालावत असल्याने संवर्धित शेती हा विषय जागतिकस्तरावर गांभीर्याने घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून २०१९ पासून यावर काम होत आहे. यंदा प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात याअंतर्गत सुमारे दहा हजार एकरांवर शून्य मशागत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यात आले आहे.

कार्बन उर्त्सजनामुळे शेती क्षेत्रातील तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. त्यावर पर्याय म्हणून संवर्धित शेतीवर भर दिला जात आहे. महाराष्ट्रात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून त्याच उद्देशातून सुमारे दहा हजार एकरांवर शून्य मशागतीचा पॅटर्न राबविला जाणार आहे. त्याकरिता प्रकल्पात समावेशीत ४९० समूह सहायकांना प्रत्येकी दहा हेक्‍टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Zero Cultivation
Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्राचा राज्यभर होतोय प्रसार

त्या माध्यमातून ४९०० हेक्‍टरवर शून्य मशागतीला प्रोत्साहन दिले जात आहे. आतापर्यंत सुमारे दोन हजार हेक्‍टरवर याची अंमलबजावणी होत नव्याने बेड पाडण्यात आले असून, लवकरच उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्‍वास या संकल्पनेला प्रोत्साहन देणारे तज्ज्ञ विजय कोळेकर यांनी व्यक्‍त केला.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा देखील या तंत्रज्ञानाला व्यापक प्रतिसाद मिळत असून शून्य मशागतीचा पॅटर्न राबविलेल्या भागातील शेतीला १९ जिल्ह्यांतून ३५०० शेतकऱ्यांनी भेटी दिल्याची नोंद आहे. त्यानंतरच्या काळात आत्मविश्‍वास वाढल्याने त्यांनी देखील याचे अनुकरण करण्यावर भर दिला आहे.

Zero Cultivation
Zero Tillage Technique : शून्य मशागत तंत्राची उपयुक्तता

...अशी आहेत वैशिष्ट्ये

त्याच बेडवर वारंवार लागवड करता येते. त्यामुळे मशागतीवरील खर्चात बचत होते. या पद्धतीत सेंद्रिय कर्ब वाढ नोंदविली गेली आहे. सेंद्रिय कर्ब ०.४ वरून ०.८ ते १ टक्‍का असा वाढल्याचे निरीक्षण आहे. या पद्धतीत १५ ते १८ क्‍विंटल एकरी कापसाची तर १५ ते १६ क्‍विंटल सोयाबीनची उत्पादकता मिळविणारे शेतकरीदेखील आहेत, असे श्री. कोळेकर यांनी सांगितले.

२०१९ मध्ये कन्नड (छत्रपती संभाजीनगर) येथील अतुल रावसाहेब मोहिते यांच्या शेतावर शून्य मशागतीचा पहिला प्रयोग करण्यात आला. दीड एकरावर कपाशी लावण्यात आली. त्याच बेडवर आजवर त्यांनी दहा पिके घेतली आहेत. पाचवेळा कपाशी घेतल्यानंतर त्याच बेडवर त्यांनी ऊस लागवड केली आहे. मध्यम जमीन असतानाही त्यांच्या शिवारात या एकाच कारणामुळे अधिक उत्पादकतेचा उद्देश साधता आला. तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करण्यास सांगितले जाते. त्यामुळे पिकासोबत तणाची मुळेदेखील जमिनीत राहतात. तणाचे व पिकाचे अवशेष बेडमध्ये राहिल्याने कर्बात वाढ झाली.
- विजय कोळेकर, मृदा विज्ञान विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com