Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest: ‘एचटीबीटी’ला अडथळा केल्यास प्रतिकार

HTBT Seeds Ban: शेतकरी संघटना एचटीबीटी बियाण्यांवर बंदीला विरोध करत असून, त्यास अडथळा आणल्यास तीव्र प्रतिकार करण्याचा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी दिला आहे. पंजाब-हरियानासारखी भूमिका महाराष्ट्र सरकारनेही घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

 गोपाल हागे

Akola News: शेतकरी संघटना जनुकीय अभियांत्रिकीचा विस्तार व्हावा या उद्देशाने सरकारी स्तरावर प्रतिबंधित एचटीबीटी हे जनुकीय संशोधित बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी २०१९ पासून सविनय कायदेभंग आंदोलन करीत आहे. हे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात कृषी विभागाने अडथळा आणला तर त्याला सर्व स्तरावर प्रतिकार केला जाईल, असा इशारा शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी दिला.

विविध विषयांबाबत शेतकरी संघटनेची भूमिका मांडण्यासाठी श्री. बहाळे यांनी येथे पत्रकारांसोबत संवाद साधला. या वेळी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश देशमुख, जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट पाटील, सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. बहाळे पुढे म्हणाले, की जर शेतकऱ्यांना या बियाण्यांचा वापर करण्यापासून अडवले गेले, तर कृषी खाते व पोलिसांच्या संयुक्त कारवायांना प्राणघातक हल्ला मानले जाईल. कारण, अशा अडथळ्यांमुळे उत्पादनात घट, खर्चात वाढ आणि आत्महत्येसारखे विचार शेतकऱ्यांच्या मनात येतात.

पंजाब-हरियानाच्या पावलावर महाराष्ट्राने चालावे

शेतकरी संघटनेने पंजाब आणि हरियाना सरकारचे आभार मानले आहेत. कारण त्यांनी एचटीबीटी मक्याच्या चाचण्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. महाराष्ट्र शासनाकडे यासंबंधी अर्ज करण्यात आले असून, त्यावर सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.

डाळी आणि तेलवर्गीय वाण वायदे बाजारात समाविष्ट करावेत

विदर्भ व मराठवाड्यात डाळी व तेलबिया वाणांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, वायदे बाजारातून या वाणांना वगळल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाहीत. केंद्र सरकारने विशेषतः अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने या वाणांचा वायदे बाजारात समावेश करण्यास सहकार्य करावे, अशी मागणी आहे. अन्यथा, सेबीच्या कार्यालयास सप्टेंबरमध्ये घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Reservation: न्यायालयाच्या नियमांचं पालन करा; जरांगे यांचं आंदोलकांना आवाहन

Qureshi Community Protest : कुरेशी समाजावरील अन्याय दूर करा

Onion Storage: कांदा साठवणीचे तंत्र, तज्ज्ञांचा सल्ला

Crop Damage Survey : पंचनामे बाजूला ठेवून तत्काळ मदत करा

Kharif Sowing : खरिपाच्या पेऱ्यात १५ हजार हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT