Desi Cotton Seeds Shortage: राज्यात देशी, सरळ कापूस वाणांचा तुटवडा

Cotton Varieties: राज्यात बीटी कापूस वाणांवरील अविश्वास वाढताना दिसतोय. अनेक शेतकरी देशी आणि सरळ कापूस वाणांना पसंती देत आहेत. मात्र हे वाण राज्यात सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांना मध्य प्रदेश आणि गुजरातकडे वळावे लागत आहे.
Cotton Seeds
Cotton SeedsAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: राज्यात बोलगार्ड २ मधील बीटी कापूस तंत्रज्ञान कालबाह्य झाल्याचा मुद्दा शेतकरी वर्गात असतानाच देशी किंवा सरळ कापूस वाणांची मागणी आहे. परंतु राज्यात देशी सरळ कापूस वाणांचा तुटवडा आहे.

विदर्भ, मराठवाडा व खानदेशात या वाणांना मागणी आहे. या भागात काही कापूस संशोधन केंद्र, विद्यापीठस्तरावर देशी किंवा सरळ कापूस वाणांची विक्री होते. पण त्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. शेतकऱ्यांना काही कंपन्यांद्वारे निर्मित सरळ किंवा देशी कापूस वाण हवे आहेत.

Cotton Seeds
Cotton Seeds : परभणी जिल्ह्यात कपाशीच्या ९ लाख बियाणे पाकिटांचा पुरवठा

परंतु संबंधित कंपन्यांना राज्यात निश्चित दरात कापूस बियाणे विक्री परवडत नसल्याने संबंधित कंपन्या अन्य म्हणजेच मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब आदी भागांत या बियाण्याची अधिकृतपणे विक्री करीत आहेत. तेथे या कंपन्यांच्या सरळ किंवा देशी कापूस वाणांना १२०० ते १५०० रुपये प्रति पाकीट (एक पाकीट ४७५ ग्रॅम क्षमता) असा दर तेथे मिळत आहे.

आपल्या सरळ किंवा देशी कापूस वाणांना राज्यात १४०० रुपये प्रति पाकिट, असा दर मिळावा, असा प्रस्ताव एका देशी कापूस वाण उत्पादक कंपनीने राज्य शासनासमोर किंवा कृषी विभागाच्या यंत्रणांसमोर ठेवला होता. परंतु या प्रस्तावास कृषी यंत्रणांच्या वरिष्ठांनी नकार दिला.

Cotton Seeds
Cotton Seed Scam : कापसाचे बियाणे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

राज्यात बोलगार्ड २ मधील बीटी कापूस बियाण्याची विक्री ९०१ रुपये प्रति पाकिट अशी निश्‍चित केलेली असल्याने यापेक्षा अधिक दरात संबंधित कंपनीच्या देशी किंवा सरळ कापूस वाणांची विक्रीस परवानगी देता येणार नाही, अशी सबब ठेवण्यात आली. यामुळे राज्यात काही कंपन्यांच्या सरळ वाणांचा पुरवठा व विक्रीच होत नसल्याची स्थिती आहे.

अन्य एका सरळ किंवा देशी कापूस वाण उत्पादक कंपनीशी बियाणे पुरवठ्यासंबंधी जळगाव जिल्ह्यातील कृषी यंत्रणांनी पत्रव्यवहार केला. परंतु संबंधित कंपनीने बियाणे पुरवठा करण्याबाबत असमर्थता दाखविली.

शेतकरी मध्य प्रदेश, गुजरातेत

खानदेशातील अनेक शेतकरी देशी सरळ कापूस वाण स्थानिक बाजारात मिळत नसल्याने त्यासाठी मध्य प्रदेश व गुजरातेत जात आहेत. तेथून दोन ते अडीच हजार रुपये प्रति पाकीट या दरात देशी व सरळ कापूस वाण आणत आहे. याचा लाभ नफेखोर, अवैध कापूस बियाणे पुरवठादार घेत असून, गुजरात, मध्य प्रदेशातून अवैधपणे देशी, सरळ कापूस वाण दाखल होत आहेत.

राज्यात २० ते २२ लाख पाकिटांची गरज राज्यात किमान सात ते आठ लाख हेक्टरवर देशी किंवा सरळ कापूस वाणांची लागवड अपेक्षित असते. अधिकृतपणे देशी किंवा सरळ कापूस वाण मिळाल्यास या क्षेत्रात आणखी वाढ होऊ शकते. कारण अनेक शेतकरी बोलगार्ड २ प्रकारातील बीटी कापूस वाणांची लागवड गुलाबी बोंड अळी, कमी उत्पादन, वाढता खर्च यामुळे टाळत आहेत. राज्यात किमान २० ते २२ लाख देशी किंवा सरळ कापूस वाणांची गरज आहे. ही गरज कृषी विद्यापीठे, कापूस संशोधन केंद्र पूर्ण करू शकत नाहीत. दुसरीकडे राज्यातील बाजारांत अधिक मागणी असलेले देशी, सरळ वाण उपलब्ध नसल्याने काळाबाजार सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यात देशी, सरळ कापूस वाण उपलब्ध व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न केले. काही देशी, सरळ कापूस वाण उत्पादक, पुरवठादारांशी पत्रव्यवहार केला. यात एका कंपनीने वाण पुरवठ्याबाबत असमर्थता दाखविली. पण यासंबंधीचा अवैध व्यापार, काळाबाजार यंत्रणेचे लक्ष आहे.
पद्मनाभ म्हस्के, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com