Mahanand Dairy Agrowon
ॲग्रो विशेष

Mahanand Dairy : ‘महानंद’च्या अध्यक्षांसह १८ संचालकांचे राजीनामे

Dairy Business : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) २१ पैकी १९ संचालकांनी राजीनामे दिले आहेत.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) २१ पैकी १९ संचालकांनी राजीनामे दिले आहेत. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने (एनडीडीबी) शासनाकडे २५३ कोटी ५७ लाख रुपयांची आर्थिक मदत मागितली आहे.

मागील महिन्यात ‘महानंद’च्या संचालक मंडळाने महानंद ‘एनडीडीबी’ला चालविण्यास देण्यासाठी मान्यता दिली होती. मात्र, संचालक मंडळाचे अस्तित्व कायम ठेवावे अशी अट घातली होती. ही अट ‘एनडीडीबी’ने अमान्य केली होती. त्यामुळे ‘महानंद’चे अस्तित्व धोक्यात आले होते. परिणामी संचालक मंडळाला बिनशर्त राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.

संचालक मंडळांची १३ वी बैठक बुधवारी (ता. २१) झाली. या बैठकीत अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह १८ संचालकांनी राजीनामे दिले. गुरुवारी (ता. २२) वैभव पिचड यांनी राजीनामा सादर केला. हे सर्व राजीनामे व्यवस्थापकीय संचालक कान्हुराज बगाटे यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत.

‘महानंद’ची राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ, आणंद या संस्थेकडे पुनरुज्जीवन प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील सहकारी जिल्हा, तालुका संघ, प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादकांना दुग्धव्यवसायात आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी राजीनामा देत असल्याचे संचालकांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

‘महानंद’च्या पुनरुज्जीवनासाठी ‘एनडीडीबी’ने बृहत् आराखडा तयार केला आहे. हा आराखडा शासनाला सादर केला आहे. त्यानुसार २५३ कोटी ५७ लाख रुपये सरकारकडून कर्जस्वरूपात देण्यात यावेत, असा ठरावही करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

या रकमेतून कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती तसेच महानंदची विद्यमान यंत्रणा, व्यवस्था एनडीडीबी नीट करू शकेल, असे सांगितले जात आहे. सध्या ‘महानंद’कडे ९४० कर्मचारी आहेत. त्यापैकी ५३० कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय दिला आहे. जास्त कर्मचारी संख्या हेच ‘महानंद’च्या डबघाईचे कारण असून आम्हाला हवे तितकेच कर्मचारी घेऊ, असे ‘एनडीडीबी’चे म्हणणे आहे.

राजीनामा दिलेल्या संचालकांची नावे

माणिकराव कोकाटे, राजेंद्र सूर्यवंशी, प्राजक्ता धस, विलास बगडे, नंदलाल काळे, रामकृष्ण बांगर, ज्ञानेश्वर पवार, विनायक बुरुडे, प्रमोद पाटील, केशर पवार, विनायक पाटील, विकास कांबळे, फुलचंद कराड, चंद्रकांत देशमुख, राजकुमार कुत्थे, निळकंठ कोढे आणि रणजितसिंह देशमुख.

महानंद ही राज्यातील सर्व दूध संघांची शिखर संस्था आहे. संघाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करूनच ‘एनडीडीबी’ला तो चालविण्यात देण्यात येईल. यासाठी ‘एनडीडीबी’ने आराखडा तयार केला आहे. संचालक मंडळाने राजीनामा दिल्याने आता प्रशासकाची नियुक्ती करावी लागेल. त्यानंतर प्रक्रियेला वेग येईल.
- कान्हुराज बगाटे, व्यवस्थापकीय संचालक, महानंद.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT