Mahanand Dairy : ‘महानंद’ची श्वेतपत्रिका काढा

Raju Shetty : ‘महानंद’चे लचके महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांनी तोडले आहेत. त्यामुळे ‘महानंद’ची श्वेतपत्रिका काढावी,’’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
Mahanand Dairy
Mahanand DairyAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : ‘‘महाराष्ट्रातील सहकारी दूध उत्पादक संघांची शिखर संस्था असणाऱ्या ‘महानंद’चे लचके महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांनी तोडले आहेत. त्यामुळे ‘महानंद’ची श्वेतपत्रिका काढावी,’’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

‘‘श्वेतपत्रिका काढल्यास पांढऱ्या दुधातील काळे धंदे उघडकीला येतील. महानंद ‘एनडीडीबी’ला चालवायला देणे म्हणजे गतिमान सरकारचे अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. ‘‘महानंद ‘एनडीडीबा’ला चालवायला दिल्यास जनआंदोलन उभे करू,’’ असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

Mahanand Dairy
Mahanand Dairy : ‘महानंद’चा हस्तांतर प्रस्ताव तत्काळ रद्द करा

श्री. शेट्टी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ‘दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी महाराष्ट्रातील सर्व दूध उत्पादक संस्थांची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य दूध महासंघाची स्थापना १९६७ मध्ये करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या सहकार्यातून १८ ऑगस्ट १९८३ ला महानंद दुग्धशाळेची स्थापना झाली आणि मुंबईत महानंद या ब्रॅण्डने दूध विक्री सुरू करण्यात आली. महानंद म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापन गुजरातमधील राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे द्यावा, असा ठराव आता राज्य सरकारकडे पाठविला आहे.

Mahanand Dairy
Mahanand Project: महानंदला घरघर का लागली?

कर्नाटक, गुजरात यांसारख्या राज्यांनी आपल्या राज्यातील दुधाला सहकारातून मोठी ताकद देऊन वेगळा ब्रॅण्ड निर्माण केला. किंबहुना ज्या वेळेस दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडेल, अशा काळात या संघाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करून दूध व्यवसाय स्थिर ठेवला आहे.

महाराष्ट्रात दुग्ध उद्योगाने ग्रामीण भागातील अर्थकारण बदलले आहे. लाखो लोकांना रोजगार निर्मिती या व्यवसायातून झालेली आहे. यामुळे राज्य सरकारने महानंद ही संस्था चालविण्यास देऊन बाजार करणे म्हणजे गतिमान सरकार व वेगवान कारभार करणाऱ्या राज्य सरकारचे अपयश आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com