Koyna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : वीजनिर्मितीचे १२ टीएमसी पाणी सिंचनासाठी राखीव ठेवा

Suresh Khade : कोयना धरणातील विद्युत निर्मितीसाठीच्या कोट्यातील १२ टीएमसी पाणी सिंचनासाठी राखून ठेवा. त्याबाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय करा, अशी मागणी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

Team Agrowon

Sangli News : कोयना धरणातील विद्युत निर्मितीसाठीच्या कोट्यातील १२ टीएमसी पाणी सिंचनासाठी राखून ठेवा. त्याबाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय करा, अशी मागणी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्याबाबतचे पत्र गुरुवारी (ता. १४) फडणवीस यांना पाठवण्यात आले.

नागरिक जागृती मंचने पालकमंत्री सुरेश खाडे यांना भेटून पाण्याची परिस्थिती गंभीर होत असल्याचे सांगितले होते. या स्थितीत तातडीने पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

त्यात म्हटले आहे, की जिल्ह्यात पाणी वापराच्या नियोजनानुसार, ४७.५ टीएमसी पाणी उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. यावर्षी जिल्ह्यात ५८.३ टक्के पाऊस पडला आहे. जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज या तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे.

पिण्यासाठी व सिंचनासाठी अतिरिक्त १२ टीएमसी पाण्याची आवश्‍यकता आहे. यावर्षी पाणीसाठा कमी झाल्याने तूट करण्यात आली आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालवाव्या लागणार आहेत. त्यामुळे सिंचनासाठी राखीव ठेवलेल्या ३५ टीएमसी पाण्यातून १२ टीएमसी पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी राखून ठेवणे गरजेचे आहे.

सध्या वीजनिर्मितीसाठी ३१.५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. त्यातील २० टीएमसी पाणी वीज निर्मितीला वापरण्यात यावे. तसा ठराव लवकर करावा. लवकर बैठक घ्यावी, अशी विनंती खाडे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT