Upsa Irrigation Scheme : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला अखेर मंजुरी

Agriculture Irrigation : गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता.१३) अखेरीस मान्यता मिळाली.
Upsa Irrigation Scheme
Upsa Irrigation SchemeAgrowon
Published on
Updated on

Solapur News : गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता.१३) अखेरीस मान्यता मिळाली. पण आता भाजपकडून आमदार समाधान आवताडे आणि काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद सुरू आहे.

मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर सोशल मीडियावर दोघांच्या समर्थकांकडून या योजनेच्या मंजुरीवर श्रेय लाटण्याची जणू स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णपणे सुटलेला नाही

Upsa Irrigation Scheme
Upsa Sinchan Yojana : कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेची मंत्री सावंतांकडून पाहणी

मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर सोशल मीडियावर दोघांच्या समर्थकांकडून या योजनेच्या मंजुरीवर श्रेय लाटण्याची जणू स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णपणे सुटलेला नाही.

या गांवामधील बहुतांश सरपंच, उपसरपंच हे सातत्याने या प्रश्नावर लोकप्रतिनिधींसह अन्य नेत्यांकडे हा प्रश्न सातत्याने मांडत आले आहेत. या आधी दिवंगत आमदार भारत भालके यांनीही त्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यानंतर आता आमदार समाधान आवताडे यांनीही त्याचा पाठपुरावा केला.

अलीकडेच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या मंगळवेढ्यातील या भागाच्या दौऱ्यावर आल्या होत्या, त्यावेळी त्यांना इथल्या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे योजनेला मंजुरी देण्याची मागणी केली होती.

Upsa Irrigation Scheme
Krishna Upsa Irrigation : ‘कृष्णा उपसा सिंचन’चे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

अगदी काही दिवसांपूर्वीच पाणी संघर्ष समितीनेही कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नावर आंदोलन करताना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहिष्कार टाकण्यासह कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने या योजनेला मान्यता दिली. पण आता मात्र आमदार आवताडे आणि आमदार शिंदे यांच्या समर्थकांकडून मात्र पोस्टरबाजीसह सोशल मीडियावरर श्रेयवादाची लढाई सुरू आहे.

...या ३५ गावांना होणार लाभ

खुपसंगी, लेंडवेचिंचळे, शिरशी, गोणेवाडी, लक्ष्मीदहिवडी, आंधळगाव, खडकी, जुनोनी, पाटकळ, येड्राव जित्ती, जाळीहाळ, हाजापूर, सिद्धन्केरी, खवे, भाळवणी, निंबोणी, रड्डे, गणेशवाडी, हिवरगाव, मेटकरवाडी, शेलेवाडी, भोसे, नंदेश्वर, हुन्नुर, मानेवाडी, पडोळकरवाडी, महमदाबाद (हु), मारोळी, लवंगी, चिक्कलगी, सलगर बु,, बावची, सोड्डी, शिवनगी या गावांना या उपसा योजनेचा फायदा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com