Agriculture Irrigation : ‘अक्कलपाडा’च्या कालव्यांतून दोन दिवसांत आवर्तन

Water Shortage : जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने जानेवारीपासूनच धुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती उद्‌भवली आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon

Dhule News : वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील विविध गावांतील पाणीपुरवठा योजनांचे जलस्रोत भरण्यासाठी व टंचाईत दिलासा देण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे येत्या दोन ते तीन दिवसांत आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे अक्कलपाडा प्रकल्पातून आवर्तन सोडण्याची मागणी जिल्हा परिषदेचे कुसुंबा गटातील सदस्य संग्राम पाटील, नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय माळी यांच्यासह धुळे तालुक्यातील काही गावांतील ग्रामस्थांनी केली होती.

Agriculture Irrigation
Water Crisis : मांगी तलावात उरले केवळ एक टक्का पाणी

या मागणीनुसार खासदार डॉ. भामरे यांनी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात दोन वेळा बैठक घेतली. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. जी. पाटील, कार्यकारी अभियंता नागेश वट्टे, जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता संजय पढ्यार तसेच जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, माजी सदस्य अजय माळी, नेरचे माजी सरपंच तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. विजय पाटील, बंडू पाटील आदी उपस्थित होते.

Agriculture Irrigation
Water Crisis : चिकमहूदला टँकरद्वारे पाणीपुरवठा

१६० एमसीएफटी पाणी

खासदार डॉ. भामरे म्हणाले, की जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने जानेवारीपासूनच धुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती उद्‌भवली आहे. यामुळे ग्रामस्थांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून सातत्याने अक्कलपाडा प्रकल्पातून डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे.

त्यानुसार अक्कलपाडाच्या उजव्या कालव्याद्वारे नेर, देऊर, लोहगड, लोणखेडी, चौगाव, गोताणे, उडाणे, सांजोरी या गावांसाठी १०० एमसीएफटी, तर डाव्या कालव्याद्वारे भदाणे, खंडलाय, शिरधाने, कावठी, मेहेरगाव आदी गावांसाठी ६० एमसीएफटी पाणी सोडण्यात यावे, जेणेकरून या गावांतील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊन दिलासा मिळू शकेल, अशी सूचना केली. यावर जिल्हाधिकारी गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवर्तन सोडण्याबाबत कार्यवाहीच्या सूचना देताना त्वरित अहवाल देण्याची सूचना केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com