Police Patil Bharti Agrowon
ॲग्रो विशेष

Police Patil Bharti : भोर, वेल्हेमधील पोलिस पाटील पदांची आज आरक्षण सोडत

Police Bharti : भोर उपविभागातील भोर आणि वेल्हे तालुक्यांतील रिक्त असलेल्या १३३ गावांतील पोलिस पाटील पद भरतीचे गावनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी ५ वाजता घेण्यात येणार आहे.

Team Agrowon

Pune News : भोर उपविभागातील भोर आणि वेल्हे तालुक्यांतील रिक्त असलेल्या १३३ गावांतील पोलिस पाटील पद भरतीचे गावनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी ५ वाजता घेण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम अभिजित मंगल कार्यालय, महाड नाका, भोर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती भोरचे उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली आहे.

भोर तालुक्यातील ७२ गावांतील पोलिस पाटील पदे रिक्त आहेत. त्यामध्ये नांद, पसुरे, म्हाकोशी, बारे बु., वाठार हि.मा, चिखलावडे बु., भिलारेवाडी, कुंबळे, पिसावरे, रांजे, कुसगाव, चिखलावडे खुर्द, भाडवली, दुर्गाडी, कुडाली खुर्द, सांगवी हि.मा, नानावळे, वावेघर, अभेपूरी, बोपे, गृहिणी, वेणूपुरी, गुढे, वेळवंड, नऱ्हे, महुडे खुर्द, कारुगण, किवत, वर्वे खुर्द, विरवाडी, भोंगवली, राजीवडी, कुंड, करंदी खुर्द, करंजे, कांबरे खुर्द, कोर्ले, डेहेण, उबार्डे, जयतपाड, देवघर, नांदगाव, निगडे, निगुडघर, निवगण, माझेरी, म्हाळवाडी, वरोडी डायमुख, साळुंगण, हिर्डोशी, कुडली बु., राजघर, शिवनगरी, माळेगाव, सांगवी खुर्द, सोनवडी, कंरदी खे. बा., करंदी बु., माजगाव, सांगवी तर्फे भोर, तळजाईनगर, दिवळे, केतकावणे निम्मे, आंबेघर, वाठार हिंगे, सावरदरे, गुणंद, भांबवडे, शिंद, तळे म्हसवली, कांबरे खेबा या गावांचा समावेश आहे.

वेल्हा तालुक्यातील पोलिस पाटील रिक्त पदे असलेली ६१ गावे पुढील प्रमाणे ः आसनी मंजाई, आसनी दामगुडा, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बु, एकलगाव, ओसाडे, कर्नावडी, कानंद, कांबेगी, कुरवटी, कुर्तवडी, कोळवडी, कोंडगाव, कोंढवली, कोंढावळे खुर्द, खामगाव, खोडद, गुगुळशी, धावर, धिसर, मार्गासनी, घोल, भागिनघर, चांदर, कोलंबी, जाधववाडी, ठाणगाव, दादवडी, दापसरे, दापोडे, धानेप, धिंडली, निवी, पाबे, पाल बु., पांघारी, पिशवी, पिंपरी, बार्शीमाळ, बालवड, वरोती खुर्द, ब्राम्हणघर, भालवडी, माजगाव, माणगाव, मोहरी, रानवडी, लव्ही खुर्द, वडगाव झांजे, वांगणी, कातवडी, वांजळे, वरसगाव, वेल्हे बु, वेल्हे बु घेरा, शिरकोली, सूरवड, हिरपोडी, मालवली, घोडकल व गिवशी गावांची सोडत सोडण्यात येणार आहे.

या सोडतीसाठी संबंधित गावांतील नागरिक, लोकप्रतिनिधी, इच्छुक अर्जदार यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोडतीस गैरहजर राहिल्यास नंतर कोणाची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT