Mahila Police Bharti : ग्रामीण भागातील 'सावित्रीच्या लेकीं'ची पोलीस दलात गगनभरारी

Team Agrowon

शारदा प्रशिक्षण केंद्र

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये 'शारदा प्रशिक्षण केंद्रा'च्या ८६ युवतींनी यश मिळवत पोलीस दलात भरती झाल्या आहेत.

Mahila Police Bharti | Agrowon

महिला पोलीस शिपाई

या ८६ रणरागिणींची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर निवड झाली आहे.

Mahila Police Bharti | Agrowon

सावित्रीच्या लेकी

ग्रामीण ग्रामीण भागातील सावित्रीच्या लेकींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवले यश कौतुकास्पद आहे.

Mahila Police Bharti | Agrowon

राजेंद्र दादा पवार

शारदानगरच्या या नव्याने पोलीस दलात रुजू झालेल्या युवती, पालकांचा सत्कार ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र दादा पवार व विश्वस्त सौ सुनंदा पवार यांनी केला.

Mahila Police Bharti | Agrowon

आतापर्यंत ७०३ मुली पोलीस दलात भरती

शारदा प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल ६१३ मुली सध्या राज्य पोलीस दलात कार्यरत असून आता भरती झालेल्या युवतींमुळे ही संख्या थेट ७०३ वर पोहोचली.

Mahila Police Bharti | Agrowon

महाराष्ट्र पोलीस भरती

कोणत्याही शैक्षणिक संस्थेने विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या करिअर साठी स्वतःहून केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे मोठे यश आहे.

Mahila Police Bharti | Agrowon

सुनंदाताई पवार

पोलीस दलात रुजू झाल्यानंतर सद्सद विवेक बुद्धीने निर्णय घ्या. आयुष्यात कामाशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला संस्थेच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी या युवतींना दिला.

Mahila Police Bharti | Agrowon

उच्च शिक्षण

तसेच उच्च शिक्षण पूर्ण करून या युवतींनी पीएसआय व डीवायएसपी पदाला गवसणी घालावी, अशी इच्छाही सुनंदा पवार यांनी यावेळी बोलून दाखवली.

Mahila Police Bharti | Agrowon

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त तथा शारदा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख सुनंदाताई पवार यांच्या संकल्पेनेतून ग्रामीण भागातील युवतींसाठी मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते.

Mahila Police Bharti | Agrowon
Dry Fish Market | Agrowon