Agriculture Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Loan : पीककर्ज वेळेत भरून घ्या शून्य व्याजदराचा लाभ

Benefits of Zero Interest Rate Loans : ३१ मार्चअखेर वसुलीला पात्र कर्जदार शेतकऱ्यांनी वेळेत भरणा करून ३ लाखांपर्यंतच्या पीककर्जास शून्य टक्के व्याजदराचा फायदा घ्यावा,’’ असे आवाहन जिल्हा सहकारी बॅंकेने केले.

Team Agrowon

Nagar News : ‘‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. जिल्हा बॅंकेने यंदा ३२११ कोटींचे अल्प मुदत शेतीकर्ज वितरण केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्पमुदत कर्ज देणारी ही एकमेव बॅंक आहे. ३१ मार्चअखेर वसुलीला पात्र कर्जदार शेतकऱ्यांनी वेळेत भरणा करून ३ लाखांपर्यंतच्या पीककर्जास शून्य टक्के व्याजदराचा फायदा घ्यावा,’’ असे आवाहन जिल्हा सहकारी बॅंकेने केले.

राज्य शासनाने पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली असली तरी शासनाने या कर्जाचे पुनर्गठन करून देण्याबाबत सूचना केल्या आहेत. परंतु अशा प्रकारचे कर्जाचे पुनर्गठन केल्यास पुनर्गठन तारखेपासून या कर्जास ११ टक्के व्याजदर परवडणारा नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले कर्ज ३१ मार्चपूर्वीच भरून शून्य टक्क्याचा लाभ घ्यावा. या मुदतीत पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना १० एप्रिलच्या आत पुन्हा पीक कर्ज जिल्हा बँक देणार आहे. याचा फायदा नियमित कर्जदार म्हणून शेतकऱ्यांनी घ्यावा. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी एकरकमी कर्जफेड योजना राबविलेली असून,

जिल्ह्यातील पात्र थकबाकीदार कर्जदाराने या योजनेचा लाभ घेऊन जिल्हा बँकेचे नियमित कर्जदार व्हावे, अशी माहिती जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्यासह संचालक मंडळाने दिली.

संचालक प्रशांत गायकवाड म्हणाले, ‘‘शासनाने नुकताच सहकार कायद्यात बदल करून जिल्हा केडरला पुन्हा पूर्नजिवित केले आहे.’’ विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव, जिल्हा बँक शाखाधिकारी, वसुली अधिकारी यांची संयुक्त कर्ज वसुली आढावा बैठक झाली. खासदार सुजय विखे पाटील, अण्णासाहेब म्हस्के, गीतांजली शेळके, अमोल राळेभात आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT