Farmer Debt Relief: महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१९ मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली; त्यांची आता कर्जमाफी योजनेचा लाभ देताना अडवणूक का? असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केला. विरोधी पक्षातील लोकांप्रमाणे त्या शेतकऱ्यांना वागणूक देऊ नका. ही कर्जमाफी आहे की कर्ज वसुली हेच कळत नाही, असा आरोप त्यांनी सरकावर केला. २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेवेळी ते बोलत होते. .अशा शेतकऱ्यांना ५० हजार देण्यासाठी ५,८०८ कोटींची तरतूद केली आहे. त्याबदल्यात शेतकऱ्यांना बँकेत किती पैसे भरावे लागतील? हे जाहीर करा, असेही त्यांनी सूचित केले. .Farm Loan Waiver: कर्जमाफीत २०१९ मधील पुनर्गठित कर्जाचा विचार करावा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी .२०१९ च्या कर्जमाफीत दीर्घ मुदतीचे कर्ज होते. २०१७ ची कर्जमाफी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. २०१७ मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील जवळपास ५ लाख ९० हजार पात्र शेतकऱ्यांना ५,४७५ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळालेली नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. .Farm Loan Waiver: कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली मोहीम; सरकारच्या शेतकरी धोरणांवर आमदार दानवेंचा जोरदार हल्लाबोल.केंद्र सरकारकडे उद्योगपतींचे १६ लाख कोटी कर्जमाफी करायला पैसे आहेत. पण शेतकऱ्यांचे कर्जमाफी करायला पैसे नाहीत. २०१४ नंतर कर्जमाफी केली का? असा सवालही त्यांनी केला..उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये त्यांनी ३२ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यातील जे शेतकरी आहेत; त्यांनी कर्ज उचलले असेल आणि ते जर थकित असेल तर अशा १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना तुम्ही केवळ ५० हजार रुपये देणार आहात. समजा त्यावेळी २ लाख रुपयांची कर्जमाफी होती. नंतर त्याला पुन्हा २ लाख रुपये कर्ज मिळाले असेल आणि ते थकित राहिले. त्या दोन लाखांचे तीन लाख झाले. तीन लाखांतील अडीच लाख भरल्यानंतरच सरकार ५० हजार देणार आहे. त्या शेतकऱ्यांकडे अडीच लाख असते तर त्याचे कर्ज थकित राहिले असते का? त्याने पैसे कुठून आणायचे? असे सवाल त्यांनी उपस्थित केले..तुम्ही आताच्या कर्जमाफी योजनेत १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना अट लावली आहे. शेतकऱ्यांसाठी राजकारण करु का, असेही ते म्हणाले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.